ग्रामीण खाद्य संस्कृती

सोलापुरी आंध्र भजी खाण्याचा मोह राहुल गांधी यांनाही आवरता आला नाही.

सोलापुरी आंध्र भजी खाण्याचा मोह राहुल गांधी यांनाही आवरता आला नाही.

आमदार प्रणिती शिंदे यांचे जबरदस्त नियोजन .काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली “भारत जोड़ो” यात्रा महाराष्ट्रात सुरु आहे. अकोला जिल्हा भारत जोड़ो पदयात्रेची जबाबदारी प्रदेश काँग्रेसने कार्याध्यक्षा आ. प्रणिती शिंदे यांच्याकडे सोपविली होती. जिल्ह्यातील बाळापुर, पातूर, वडेगाव, धानेगाव येथे भारत जोड़ो पदयात्रा होती. या दिवशी खा. राहुल गांधी आणि काँग्रेस नेतेमंडळी यांच्या दुपारच्या जेवनाच्या मेजवानीचा बेत आ. प्रणिती शिंदे यांनी अकोला जिल्ह्यातील पातूर ते बाळापुर मार्गावरील गजानन रोपवाटिका येथे आयोजीत केला होता.बहुभाषिक सोलापुरचे असे काही खाद्यपदार्थ आहेत की, जे पाहताच कोणताही खवय्य्या स्वताला खाण्यापासून थांबवू शकणार नाही असे विविध पदार्थ या जेवणाच्या मेजवानीत केले होते, त्यामध्ये मिर्ची चिरुन चिंच आणि इतर पदार्थ भरून केलेली खमंग गरमागरम आंध्र भजी, खुशखुशीत चटपटीत धपाटे, दही सोबत झणझणीत शेंगा चटणी, सोलापुरची ख़ासियत असलेली ज्वारीची आणि बाजरीची कड़क भाकरी, पौष्टिक गव्हाची हुग्गी यासारखे स्वादिष्ठ पदार्थ मेजवानीत होते. राहुलजी गांधी आणि उपस्थित नेतेमंडळीनी मनसोक्त जेवणाचा आस्वाद घेतला. आणि अतिशय चविष्ठ पदार्थ होते असे कौतुक केले.यावेळी राहुल गांधी यांनी सर्व पदार्थांची माहिती संबंधीत सोलापुरच्या स्वयपाक केलेल्या महिला भगीनी कडून घेतली तसेच भजी बनवित असताना बघून राहुलजीना तळण्याचा मोह आवरता आहे नाही. स्वता त्यांनी काही भजी तळले. त्यामुळे उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर राहुल गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेमध्ये राबलेल्या आ. प्रणिती शिंदे आणि सर्वांचे कौतुक केले.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]
  1. आलापुरी खाद्य पदार्थ बनविण्याकरीता यल्लाप्पा तुपदोळकर, शांतकुमार बळगेरी, महानंदा रामपुरे, लक्ष्मी यादगिरी, पद्मिनी शेट्टीयार, समाधान हाके यांनी परिश्रम घेतले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button