Akkalkot : कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा.विजयकुमार पवार कृतीशील प्राध्यापक पुरस्काराने सन्मानीत

अक्कलकोट (प्रतिनिधी): येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतनचे उपप्राचार्य प्रा.विजयकुमार पवार यांना जिल्हास्तरीय अभियांत्रिकी महाविद्यालय कृतीशील प्राध्यापक पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले.

पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंत सर यांच्या संकल्पनेतून साकारलेला यंदाचा मानाचा जिल्हास्तरीय हा कृतीशील प्राध्यापक पुरस्कार पुरस्कार सोहळा सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य कृती समितीचे संस्थापक व माजी शिक्षक आमदार मा.दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभहस्ते शाल, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रा.विजयकुमार पवार सर यांना सन्मानीत करण्यात आले. या पुरस्कार प्रित्यर्थ कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन व श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी प्रा.विजयकुमार पवार सर यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान केला.याप्रसंगी बोलताना महेश इंगळे यांनी विजय पवार सर यांना लाभलेल्या कृतिशील प्राध्यापक पुरस्कार हा आपल्या महाविद्यालयासाठी अविस्मरणीय क्षण असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रथमेश इंगळे, प्रा.नागनाथ जेऊरे, प्रा. शिवशरण अचलेर, मेकॅनिकल विभागाचे प्रमुख मल्लू माने, सिविल विभागाचे प्रमुख धीरज जनगोंडा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचे प्रमुख वैजनाथ खिलारी, शैक्षणिक समन्वयक अमोल भावठाणकर, सचिन घाटगे, नितीन ग्राम, श्रीशैल गवंडी, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे, विपूल जाधव, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे आदींसह महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

