श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्तजयंती निमित्तविविध धार्मिक कार्यक्रम संपन्न

शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.असून न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेच्या २०० लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप करण्यात आले.

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात श्री दत्तजयंती निमित्तविविध धार्मिक,शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.असून न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेच्या २०० लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप करण्यात आले.

*अक्कलकोट*, दि.७ : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली श्री दत्तजयंती निमित्त बुधवारी सकाळी विविध धार्मिक कार्यक्रमानंतर शेकडो स्वामी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला असून न्यासाकडून सुरु असलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेच्या २०० लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप करण्यात आले.

दरम्यान पालखी पादुका परिक्रमा बसचे इंटेरिअर व सिंहासन करुन सेवा रुजू केलेले महेश माळी व दत्तात्रय पाटील या दांपत्य, देणगीदारासमवेत महानैवेद्य, आरती संपन्न झाल्यानंतर न्यासाने सुरु केलेल्या समर्थ महाप्रसाद सेवेला श्रीदत्त जयंतीच्या या दिवशी एक वर्ष पूर्ण झाले असून, दररोज २०० निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो.

याकामी कार्यरत असलेले जयहिंद फुड व रॉबिनहुड आर्मीचे देविदास गवंडी, आशिष हुंबे, अनंत क्षीरसागर, समर्थ शिरसाट, श्रीधर गुरव, अप्पा गवळी, अंकुश चौगुले, अतिश पवार, योगेश पवार यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, अक्षय टोणपे, गुन्नय्या स्वामी, सागर पवार व माळी-पाटील दापंत्यांचा अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रीदत्त व श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, कृपावस्त्र व हार देऊन मंडळाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. कोल्हापूर ते श्रीक्षेत्र अक्कलकोट पर्यंत पायी आलेल्या स्वामी रथाचे स्वागत अन्नछत्र मंडळात प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी जय हिंद फूडचे अंकुश चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. महेश माळी व दत्तात्रय पाटील यांच्या हस्ते संकल्प सोडल्यानंतर महाप्रसादास सुरवात करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा.शिवशरण अचलेर यांनी मानले.

*चौकट :*
*समर्थ महाप्रसाद सेवाच्या २०० लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप :*
गेल्या वर्षभरापासून न्यासाकडून दररोज २०० निराधार, दिव्यांगांना दोन वेळचा समर्थ महाप्रसाद डबा घरपोच दिला जातो. अशांनकरिता आजच्या श्रीदत्त जयंती निमित लाभार्थ्यांना महाप्रसादा बरोबरच ब्लँकटचे वाटप महेश माळी व दतात्रय पाटील आणि त्यांच्यासमवेत उपस्थित नैवेद्याचे श्रीभक्त, देणगीदार याच्या हस्ते करण्यात आले. सदर लाभार्थ्यांना शहरातील विविध ठिकाणाहून अन्नछत्र मंडळात आणण्यात आले. पहिल्या पंक्तीत महाप्रसाद घेतल्या नंतर लाभार्थ्यांना ब्लँकटचे वाटप करण्यात आले.

*चौकट :*
अक्कलकोट शहरातील गरजू,वृद्ध,दिव्यांग,निराधार लोक आम्ही या अगोदर उपाशी राहून दिवस काढलो आहोत, मात्र श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या संकल्पनेतून व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या “समर्थ महाप्रसाद” सेवेमुळे आमच्यासारख्यांची भुकमार थांबल्याचे लाभार्थी शरीफ मुल्ला यांनी सांगितले.

*चौकट :*
“समर्थ महाप्रसाद” सेवेने गेल्या वर्षभरात मोठा टप्पा पार केला असून २०० जणांना सकाळी व संध्याकाळी पुरेल असा घरपोच डबा देण्यात येत आहे.बाहेरून आलेल्यांची अन्नछत्रच्या माध्यमातून सेवा केली जाते.परंतु आपल्याजवळील निराधार, दिव्यांगांना आधार मिळावा म्हणून ही सेवा गत दत्तजयंतीपासुन देत असल्याचे प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी सांगितले.

या कार्यक्रमास न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, लक्ष्मण पाटील, माजी नगराध्यक्षा अनिता खोबरे, मनोज निकम, अरविंद शिंदे, वैभव नवले, मुख्य लेखापरीक्षक ओंकारेश्वर उटगे, अप्पा हंचाटे, मुख्य अभियंता किरण पाटील, अभियंता अमित थोरात, राज्य राखीव दल बल गट क्र.१० जिल्हा समादेशक विजयकुमार चव्हाण, अभिजित वैद्य, डॉ.शिवाजीराव भोसले, डॉ.सुधीर जोशी, अक्कलकोट घडामोडीचे आनंदराव चौगुले, समर्थ जाधव, विशाल जाधव, रोहित चौगुले, दीपक चौगुले, शिंदे गट शहर प्रमुख योगेसह पवार, सौरभ मोरे, प्रथमेश पवार, विशाल कलबुर्गी, राहुल शिंदे, निखील पाटील, सिध्दाराम जाधव, सागर हळगोदे, कृकांत कमलीवाले, पिंटू साठे, प्रवीण घाडगे, विजय माने, रोहित खोबरे, स्वामिनाथ कोळी, स्वामिनाथ बाबर, विराग माणिकशेट्टी, श्री शहाजी प्रशालेचे मुख्याद्यापक एस.आर.कांबळे, एस.व्ही. भांगरे, श्री चव्हाण, ज्ञानेश्वर भोसले, गणेश लांडगे, राहुल साठे, राहुल इंडे, मल्लिकार्जुन बिराजदार, दत्ता माने, श्रीनिवास गवंडी, परशुराम बिराजदार, न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सोमकांत कुलकर्णी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवा हंजगे, संभाजीराव पवार, प्रसाद हुल्ले, बाबुशा महिंद्रकर रमेश हेगडे, राजेश काटकर, राजू पवार, गोविंदराव शिंदे, रवी श्रीमान, राम बालशंकर, काशिनाथ वाले यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button