गावगाथा

स्वच्छता, सुरक्षितता आणि संस्कृती जपत अन्नसेवा – प्रविण तरडे

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

स्वच्छता, सुरक्षितता आणि संस्कृती जपत अन्नसेवा – प्रविण तरडे
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अन्नछत्र हे स्वच्छ, सुगम, सुरक्षित असून भारतीय संस्कृती व परंपरा जपत भाविकांना सेवा देणारे एक आदर्श केंद्र असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता प्रविण तरडे यांनी काढले. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या अन्नछत्राच्या कार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
प्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेता प्रविण तरडे यांनी नुकतीच श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास सदिच्छा भेट दिली. यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रविण तरडे म्हणाले की, “भाविकांसाठी चालवले जाणारे अन्नछत्र हे केवळ अन्नदान नसून ती एक सेवा, साधना आणि संस्कृती जपण्याची परंपरा आहे. अक्कलकोट येथील अन्नछत्र हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.”
यावेळी न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी, एस. के. स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शिवू स्वामी, अनिल बिराजदार, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे अन्नछत्र मंडळाच्या सेवाभावी कार्याला नवी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button