श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाची सेवा ही धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य न्यास न्यायाधीश अनिता कुलकर्णी
महाप्रसादाची सेवा ही धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य न्यास न्यायाधीश अनिता कुलकर्णी

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाची सेवा ही धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य न्यास
न्यायाधीश अनिता कुलकर्णी

,,.

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या महाप्रसादाची सेवा ही धार्मिक क्षेत्रातील अग्रगण्य न्यास असल्याचे मनोगत सोलापूर कामगार न्यायालयाच्या न्यायाधीश अनिता कुलकर्णी यांनी व्येक्त केल्या.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.

याप्रसंगी राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र मोहिते नागपूर व कोप्पळ गवीसिद्धेश्वर महास्वमिजींच्या अन्नदासोह केंद्राचे मुख्य अधिकरि संगण्णा गडगी यांच्या देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. नरेंद्र मोहिते यांच्या समवेत सुनील चौपडे चंद्रपूर, वंदना शिर्के (रोटकर), मंगला कोल्हे, मनीषा मोहिते, गजाभाऊ राऊत, रितेश झांबरे तर न्या.कुलकर्णी यांच्या समवेत सोलापूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.कल्पना ठाकूर, अंगरक्षक महिबूब शेख, सोमलिंग खराडे हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, पुरोहित अप्पू पुजारी, बाळासाहेब पोळ, सतिश महिंद्रकर, नामा भोसले, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, अभियंता अमित थोरात, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.