गावगाथा

जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षापासून सुरु असलेले अन्नछत्र मंडळ हे आम्हां पुणेकरांची श्रद्धा स्थळ — आमदार सिद्धार्थ शिरोळे, 

अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुरस्कार-२०२५ हा पुण्यातील स्वामी भक्त विरेंद्र किराड यांना प्रदान

जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षापासून सुरु असलेले अन्नछत्र मंडळ हे आम्हां पुणेकरांची श्रद्धा स्थळ — आमदार सिद्धार्थ शिरोळे, 

 

HTML img Tag Simply Easy Learning    
  • अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
    *श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ३८ वर्षापासून सुरु असलेले अन्नछत्र मंडळ हे आम्हां पुणेकरांची श्रद्धा स्थळ असल्याचे मनोगत आमदार सिद्धार्थ शिरोळे, पुणे 
  • पुणे येथील कॉंग्रेस भवनाच्या प्रांगणात सालाबादप्रमाणे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, श्री क्षेत्र अक्कलकोट यांची श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा महाराष्ट्र यंदाचे २८ वे परिक्रमा असून, अन्नछत्र मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पुरस्कार-२०२५ हा पुण्यातील स्वामी भक्त विरेंद्र किराड यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम, व पालखीची उपस्थित शेकडो महिलांच्या उपस्थितीत सामुहिक महाआरती, दर्शन सोहळा वर्ष-२८ वे, भंडारा या आदी कार्यक्रमाप्रसंगी आमदार सुद्धार्थ शिरोळे हे बोलत होते.
  • दरम्यान आमदार-सिद्धार्थ शिरोळे, आमदार-हेमंत रासने, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या हस्ते व पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू- पराग कालकर, न्यासाचे सचिव शामराव मोरे, न्यासाचे खजिनदार लाला राठोड, अखिल मंडई पुणे चे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे विश्वस्त अण्णासाहेब थोरात ,चंद्रकांत तथा भाऊ कापसे, न्यासाचे कायदे विषयक सल्लागार अॅड. नितीन हबीब, पालखी परिक्रमा मुख्य संयोजक संतोष भोसले, विजयराव काजळे, नामदेवराव मोहिते, शिरीष मावळे, विलास चव्हाण, राजाभाऊ वरखेडे, विनायक घाटे, अक्कलकोट तालुक्यातील गोगावचे सुपुत्र उद्योगपती मधुकर सुरवसे, बाळासाहेब कुलकर्णी-देसाई-बबलादकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याचे सुपुत्र निसीम स्वामी भक्त, माजी नगरसेवक पुणे म.न.पा. विरेंद्र किराड यांना श्री स्वामी सामर्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • पुढे बोलताना आमदार सुद्धार्थ शिरोळे म्हणाले अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाआशीर्वादाने असंख्य भक्तांचे कल्याण झाले असून, स्वामी भक्तांना श्री स्वामींच्या महात्म्याची प्रचीती येत आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे धार्मिक कार्याबरोबरच पालखी पादुका परिक्रमा ही महान परंपरा पुढे नेत असल्याचे यावेळी आमदार शिरोळे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
    आमदार हेमंत रासने यांनी भोसले पिता-पुत्र यांनी न्यासाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा विषयक, आपदग्रस्थाना मदत, आरोग्यविषयक आदि विविध कार्यक्रम राबविले जातात तसेच शासनाच्या विविध उपक्रमांना हे न्यास वेळोवेळी सर्वोतोपरी सहकार्य करीत असते ही बाब ही उल्लेखनीय असल्याचे सांगून गेल्या २ दशकाहून अधिक काळ श्री स्वामी समर्थ पालखी पादुका परिक्रमा आम्हा पुणेकरांना एक सांस्कृतिक परवणीच असल्याचे यावेळी आ. रासने म्हणाले.
  • या प्रसंगी पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू- पराग कालकर पुढे बोलताना म्हणाले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून पुण्याच्या सांस्कृतिकतेत भर पडत असल्याचे सांगून, पालखी परिक्रमेच्या माध्यमातून सकल स्वामी भक्तांना एकत्र करण्याचे काम न्यास करत असल्याचे कालकर म्हणाले.
  • यावेळी शेकडो महिलांच्या उपस्थितीत सामुहिक महाआरती मोठ्या मंगलमय वातावरणात संपन्न झाली. आरती नंतर दर्शन सोहळा व भक्तांना महाप्रसाद देण्यात आले.
  • या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने तुकाराम देठनकर, हर्षद कुलकर्णी यांचा शहनाई ग्रुप कार्यक्रमासह लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था यांचा साई सातसूर सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती गंधर्व मुकुंद बादरायनी यांचा स्वरसमर्थ अभंग वाणी तर योगेश तपस्वी व सहकारी यांचा स्वामी गीत सुगंध या कार्यक्रमासह रक्तदान शिबीर संपन्न झाले.
  • या प्रसंगी श्रीपाद थोरात, बाबा रोटे, राजाभाऊ शिर्के, माऊली लोणारे, सुरज थोरात, अविनाश सुपेकर, केम्पन्ना नाईक, संदीप चव्हाण, लाला गायकवाड, किशोर म्हस्के, रमेश माने, डॉ. संजय खेडकर, भगवान बलकवडे, बाळू गोंडा, दादा मोरे, नंदू कटके, पुष्कराज चिकणे, सिद्धांत काजळे, कोशल सलिम शेख, मोहन परखडे, श्रीपाद काळे गुरुजी, विजयराव खराडे, प्रसाद माने, चेतन वाघमले, विजयराव कराळे, डॉ. मंदार अंबिके, नाथाभाऊ परदेशी, राहुल मोरे, सचिन परदेशी, संदीप शेळके, प्रथमेश घाटे, हरिष मोरे, नारायण चांदणे, अजय जवेरी, संतोष तांजणे, प्रणव मलभरे व पै. अमोल पडळकर मित्र परिवार पुणे, अक्कलकोट घडामोडी चे धोंडाप्पा नंदे, स्वामिनाथ चौगुले, आनंदराव चौगुले, विश्व न्यूज मराठी व आकाशवाणी सोलापूरचे बातमीदार मारुतीराव बावडे, मारुतीराव बोरकर, महिंद्रकर, धनंजय सुरवसे, स्वामिनाथ बाबर, श्री चव्हाण, गणेश भोसले, राहुल इंडे, महांतेश स्वामी, प्रशांत साठे, संतोष माने, गोकुळ पाटील, संतोष दणके यांच्यासह पुणे शहरातील बहुसंख्येने स्वामी भक्त उपस्थित होता.
  • कार्यक्रमाचे प्रास्थाविक, सूत्रसंचाल व आभार विनायक घाटे यांनी मानले.
  • *चौकट-*
    *सेवेचे फळ –* माझे वडील माजी खासदार अनिल शिरोळे यांच्या समवेत मला श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सेवा व महाप्रसाद घेण्याचा योग आला. मंडळ स्वामी भक्तांची करत असलेली सेवा मला करायला मिळाली, धन्य झालो आज त्याच सेवेचे फळ आमदार रुपी मिळाले असून, जनतेची सेवा करण्याची ताकद शिरोळे कुटुंबीयावर कायम रहावी हिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना!
  • आमदार – सिद्धार्थ शिरोळे पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button