युवकाच्या मनात आत्मविश्वास पेरणारे सेवाभावी नेतृत्व….. अमोलराजे भोसले…
अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाला नव्या उंचीवर नेणारे वैभवशाली नेतृत्व म्हणजे मा. अमोल राजे भोसले....

युवकाच्या मनात आत्मविश्वास पेरणारे सेवाभावी नेतृत्व…..
अमोलराजे भोसले…

मराठीत एक म्हण आहे… “कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गरुडभरारीचे वेड हे रक्तातच असावं लागतं…” अगदी असंच अक्कलकोटच्या अन्नछत्र मंडळाला नव्या उंचीवर नेणारे वैभवशाली नेतृत्व म्हणजे
मा. अमोल राजे भोसले….

परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचं सोनं झालेलं मी तरी कधी पाहिलं नाही परंतु एका परिसतुल्य माणसाच्या कर्तुत्वाच्या स्पर्शाने एका अध्यात्मिक आणि धार्मिक परिसराचं सोनं झालेलं आपण पाहतो… ते परिसतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे माननीय आदरणीय जनमेजय महाराज भोसले साहेब….

अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून अक्कलकोटसह महाराष्ट्रातील, देशातील तमाम स्वामी भक्तांना चविष्ट, रुचकर, पोटभर अन्नदान करण्याचं पवित्र काम आदरणीय महाराज १९८८ पासून करत आहेत. तीन किलो तांदळांवर सुरू झालेलं हे अन्नछत्र आज अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला हेवा वाटावा अशा पद्धतीचं काम करत आहे.
ज्या हिंमतीने आदरणीय महाराजांनी हे अन्नछत्र उभं केलं.. त्याच हिंमतीने, बुद्धि कौशल्याने, माणसं जोडण्याच्या कलेने आदरणीय अमोलराजे भोसले हा अन्नदानाचा वसा आणि वारसा तितक्याच नेटाने पुढे नेताना दिसतात. अन्नछत्राच्या गार्डनमध्ये गेल्यानंतर कोणत्याही स्वामीभक्ताला असं वाटत नाही की आपण अक्कलकोट मध्ये आहोत…. मुंबई पुण्याच्या धरतीवर उभी केलेली ही बगीचा इथल्या बालगोपाळासहित आबाल वृद्धा ना स्वामीभक्तांना नेहमीच आनंद देत असते. स्वच्छ सुंदर परिसर, प्रसन्न वातावरण, शिवसृष्टी, गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित होणारे भव्य दिव्य कार्यक्रम,
ठिकठिकाणी झाडांची लागण, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, सुलभ स्वच्छताग्रह, अशा अनेक सुविधानी युक्त असलेले अन्नछत्र मंडळ म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामींच्या दर्शनानंतर मिळणारे सर्वोच्च समाधान असते. कोरोना काळानंतर वाढती भक्तांची गर्दी पाहता दररोज दुपारी चार पर्यंत आणि रात्री उशिरापर्यंत अन्नछत्राचं अन्नदानाचं काम हे अखंडपणे सुरू असतं. अन्नछत्रातील दैनंदिन अन्नदानासह अक्कलकोट शहरातील गरजू, कामगार, अनाथ भुकेल्या लोकांना दररोज 200 डबे त्यांच्यापर्यंत पोहचवण्याचं पुण्यकर्म अमोलराजे यांच्या नेतृत्वाखाली नित्यनियमाने पार पडत आहे.
जनमेजय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली युथ आयकॉन अमोल राजे यांनी नव्याने दत्त मंदिराची उभारणी करत या परिसराला अधिक रम्य बनवले आहे. अन्नछत्र मंडळाचा एवढा मोठा पसारा सचोटीने सांभाळून
अमोल राजे भोसले यांनी आपल्या दूरदृष्टीची चुणूक दाखवत अन्नछत्राचा विस्तार करण्याचा निश्चय केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा अत्यंत दिमाखदार सोहळा साजरा करण्यात अमोल राजेंचा सिंहाचा वाटा असतो. लेझीम संघाच्या माध्यमातून युवकांचे संघटन करून प्रत्येक युवकाच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा युवानेता तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. भेटणार्या प्रत्येकाचे परिपूर्ण समाधान करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्याची क्षमता राजेंकडे आहे. म्हणूनच जनमानसात त्यांच्याप्रती आदराची आणि स्नेहाची भावना आहे. अत्यंत कमी वयात मा. जनमेजय महाराज भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एवढ्या मोठ्या संस्थेचा डोलारा सांभाळताना मित्रपरिवाराची त्यांच्या वयक्तिक अडचणींची देखील विचारपूस करत त्यातून मार्ग काढणारे हे
युवा नेतृत्व आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असणार आहेत……

आज अमोलराजेंचा वाढदिवस… त्यानिमित्ताने तमाम मित्रपरिवाराच्या वतीने शुभेच्छा देताना मनस्वी आनंद होतो आहे….

आदरणीय राजे… आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो… तुमच्या भविष्यकालीन कार्याला चार चांद लागो… यापुढील काळात आपल्या नेतृत्वाची व्याप्ती यापेक्षाही अधिक गतीने वाढत राहो… हीच आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा….🌹🌹