वाढदिवस विशेष

आझाद हिंद व जमगे-गवंडी मित्र परिवाराच्या वतीने महेश इंगळेंचा सन्मान

इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना शैक्षणिक साहित्य व गरजूंना चादरी वाटप

आझाद हिंद व जमगे-गवंडी मित्र परिवाराच्या वतीने महेश इंगळेंचा सन्मान

HTML img Tag Simply Easy Learning    

सदैव कार्य तत्पर असणारे जमगेंचे
व्यक्तीमत्व सर्वांना प्रेरणादायी -महेश इंगळे

HTML img Tag Simply Easy Learning    

इंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांना शैक्षणिक साहित्य व गरजूंना चादरी वाटप

HTML img Tag Simply Easy Learning    


संतोष जमगे हे आझाद गल्लीतील व अक्कलकोट शहरातील एक धडाडीचे युवक आहेत. त्यांना कोणत्याही क्षणी एखादे काम सोपविल्यास सदैव लगेच हजर होऊन कामे मार्गी लावतात. रात्री व दिवसाची ही तमा न बाळगता सदैव कार्य तत्पर असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे, म्हणून जमगे यांचे कार्यतत्पर व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी असल्याचे मनोगत येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी व्यक्त केले. निमित्त होते महेश इंगळे यांचे वाढदिवस. आज आझाद हिंद मित्रमंडळच्या वतीने आझाद गल्ली येथील घाणदेवी कट्टयावर महेश इंगळे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी महेश इंगळे बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी आझाद हिंद मित्र मंडळ व संतोष जमगे मित्रपरिवार यांच्या वतीने महेश इंगळेंचा शाल,पुष्पगुच्छ, हार, श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. याप्रसंगी केकही कापून इंगळेंचा वाढदिवस साजरा झाला. सर्वांनी महेश इंगळे यांना वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या. यावेळी आझाद गल्लीतील बालकांना संतोष जमगे मित्र परिवाराच्या वतीने टिफिन डबे, शैक्षणिक साहित्य, व परिसरातील गरजूंना चादरींचे वाटप महेश इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष सुरवसे सर यांनी केले तर आभार सुभाष आंदोडगी यांनी मानले. यावेळी सिद्धाराम लाळशेरी, अरविंद पाटील, शिवशरण इचगे, कल्याणी छकडे, महादेव आडवीतोटे, स्वामीनाथ कोळ्ळे, सुभाष पेठकर, मल्लीनाथ गवंडी, श्रीशैल गवंडी, कांत झिपरे, शशिकांत इचगे, अतुल जाधव, मल्लिनाथ म्हेत्रे, स्वामीनाथ बकरे, इरय्या स्वामी, शिवानंद कार्ले, विजय कोळ्ळे, गुंडू कांदे, राहुल वाडे, स्वामीनाथ जकापुरे, स्वामीनाथ जीवनगोळ, प्रशांत स्थावरमठ, सिद्धाराम स्थावरमठ, अरुण शिंदे, संतोष जमगे, गणपती सलगरे, श्रीशैल सवळी, दादा कुलकर्णी, महांतेश आडवीतोटे, रामू इचगे, श्रीशैल इचगे, लखन गवळी, शिवप्पा रामपुरे, सुभाष बकरे, अप्पी मिनगले, आदिसह बालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – महेश इंगळेंच्या वाढदिवसानिमित्त बालकांना शैक्षणिक साहित्य व गरजूंना चादरींचे वाटप करतानाचे प्रसंग, तर दुसऱ्या छायाचित्रात महेश इंगळे यांचा सत्कार करतानाचे प्रसंग दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button