सिद्धमा खेड एका रोजगाराच्या मुलीचे पोलिसात भरती झाल्याने अख्या गावाचे उंचावल आहे.
संगोगी (आ) (ता अक्कलकोट) येथे गेल्या 75 वर्षापासून गावातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नव्हते

सिद्धमा खेड एका रोजगाराच्या मुलीचे पोलिसात भरती झाल्याने अख्या गावाचे उंचावल आहे.

संगोगी (आ) (ता अक्कलकोट) येथे गेल्या 75 वर्षापासून गावातील एकही व्यक्ती सरकारी नोकरीत नव्हते मात्र एका रोजगाराच्या मुलीचे पोलिसात भरती झाल्याने अख्या गावात आनंदाचा वातावरण पसरलेला आहे.
अक्कलकोट तालुक्यातील संगोगी (आ) हे गाव गेल्या पाचशे वर्षांपूर्वी वसलेला आहे भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले तरी हा गाव विकासापासून वंचित होती पण कर्तव्यदक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी चारही बाजूने डांबरीकरण रस्ता करून या गावाला सौरस्त्याचा स्वरूप आणलेला आहे. मात्र या पुर्वी गावाला मजबूत रस्ता नसल्याने इच्छा असताना देखील पालक आपल्या पाल्यांना शिक्षण देऊ शकले नाही.

गावचा रस्ता आणि घरची हालाखीची परिस्थिती मुळे इच्छा असतानाही एकही मुलगा शिक्षण घेऊ शकले नव्हते. आत्ता सध्या गावात शेकडो विद्यार्थ्यां उच्चविद्याविभूषित असतानाही सरकारी नोकरीत नव्हते. नोकरी व रोजगार मिळत नसल्यामुळे सिकले सवरलेले मुलं मुंबई पुणे सारख्या ठिकाणी रोजगारासाठी गेलेले आहेत.

त्यातीलच एक अत्यंत गरीब व प्रतिकूल परिस्थितीत जन्मलेली सिद्दम्मा नागप्पा खेड या विद्यार्थिनीने बारावीपर्यंत शिक्षण घेतले परंतु घरची हालाखीची परिस्थिती असल्यामुळे आई-वडिलांच्या सांगण्यावरून बारावी नंतर शिक्षण सोडली होती. मात्र सिद्धमा खेड च्या मामाने मुलीच्या अंगातील जोश कष्ट करण्याची प्रवृत्ती पाहून त्यांनी स्वखर्चाने अक्कलकोट शहरातील सिद्धाराम शंकर प्रतिष्ठान येथे पोलीस अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन दिला.

मामाने दिलेल्या या सुवर्णसंधीचा सोनं करण्यासाठी सिद्धमा खेडने अथक परिश्रम व प्रयत्न करून जिद्दीच्या जोरावर पुणे येथे झालेल्या पोलीस भरतीत भाग घेऊन या स्पर्धेत सर्व स्तरावर उत्तीर्ण झाली आणि पोलीस भरतीत यशस्वी झाली कर्तुत्वान सिद्दमा खेड मुळे संगोगी (आ) गावात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे . स्वातंत्र्याच्या 75 नंतर ही एक ही व्यक्ती सरकारी नोकरीत एकही व्यक्ती गावातील नाही हा डाग सिद्धांमा नागाप्पा खेड या यु वतीने पुसून काढलेला आहे .

तिच्या कर्तुत्वाचा संगोगी (आ) गावासह पंचक्रोशीत सर्व स्तरातून कौतुक व स्वागत होत आहे . तिला मिळालेल्या या यशाला मामा, आई, वडील, यांचे आशीर्वाद व सहकार्य लाभले असून सिद्धाराम शंकर प्रतिष्ठानचे प्रशिक्षक भुजबळ सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचे सिद्धम्मा खेड सांगत आहे तिला या यशाबद्दल अक्कलकोट तालुक्याचे विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी भ्रमणध्वनीवरून शुभेच्छा दिला आहे.