
सामाजिक जाणीव ठेवून कार्य करणाऱ्या सौ ऋता रानडे मॅडम

१७ सप्टेंबर वाढदिवसा निमित्त

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

आज १७ सप्टेंबर सन्मा. सौ ऋता रानडे मॅडम यांचा वाढदिवस…
मॅडम आपल्या जॉय च्या सभासद आहेत…त्यांना सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त आपल्या जॉय संस्थेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो…त्या कुर्ला येथील पंत वालावलकर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत वरिष्ठ शिक्षिका म्हणून कार्यरत असून इयत्ता नववी दहावीला Maths व Science शिकवितात.त्यांची साधारण २६-२७ वर्ष सर्व्हिस पूर्ण
झाली असून त्या खूप छान शिकवितात आणि मुख्य म्हणजे त्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका आहेत…आजपर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी घडवलेत की जे मोठ मोठ्या हुद्यावर कामाला आहेत. अशी मनापासून काम करणारी व्यक्तिमत्व जिथे जिथे असतील त्या त्या संस्थेचा तो अभिमान असतो.जॉय ला देखील त्यांचा खूप अभिमान वाटतो..पेशाने शिक्षिका असल्या तरी त्यांचा पिंड हा सामाजिक कार्याचा राहिलेला असून कोणत्याही सामजिक कार्यासाठी सढळ हस्ते, पाठीपुढे न पाहता मदत करणे यासाठी त्या नेहमीच पुढाकार घेताना दिसतात..जॉय चे अनेक उपक्रमांना त्यांनी आतापर्यंत खूप मदत केलेली आहे.
मला चांगल आठवतंय जॉय चे सुरवातीच्या काळात त्यांनी एकदा दिवाळी आधी फोन करून मला संगितले होते की एखाद्या वृद्धाश्रमात मला नवीन कपडे व खाऊ मदत करायची आहे, हिरवे सर तुम्ही आश्रम शोधा, बाकीचं मी बघते.. त्याप्रमाणे त्यांनी स्वतःहुन चांगल्या उच्च प्रतीच्या ३० गाऊन आणि बनियन घरी आणून ठेवल्या होत्या…नंतर ते सामान मी व भूषण ने त्यांच्याकडून Collect करून आपण डॉ. निरंजन वाघ यांच्या जोगेश्वरी सोसायटी रोड येथील वृद्धाश्रमात जाऊन जॉय चे कार्यकर्त्यांनी त्याचे वाटप केले होते.
जॉय चे अनेक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मॅडम नी परीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे.

अनेकवेळा त्यांच्या घरी जाण्याचा योग आला.साधी राहणी आणि चांगले विचार करून कार्यरत राहणे यासाठी रानडे कुटुंबीय धडपडत असते..घरी गेलो तेव्हा त्यांच्या मातोश्री ना देखील भेटण्याचा योग आला.त्या देखील शिक्षिका होत्या,आता सेवानिवृत्त आहेत..बोलायला अगदी साधी सरळ अशी ही सर्व माणसं..कोणताही बडेजाव पणा नाही.या हाताने केलेली मदत त्या हाताला कळू नये याची पुरेपूर काळजी घेणारी. खरंच अशा लोकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मरताना खूप समाधान वाटत.अशा व्यक्ती पैशाने श्रीमंत असल्या तरी मनानेही अधिक श्रीमंत असतात याचा प्रत्यय मला त्यांच्याशी गप्पा मारताना आला. मनाने श्रीमंत राहून दुसऱ्यासाठी काही करण्याची तळमळ उराशी बाळगून काम करीत राहायला यांना आवडते.अशी लोकं समाजात फारच कमी आढळतात.रानडे परिवार देखील असाच आहे..पैशाने श्रीमंत पण त्यापेक्षा मनाने अधिक श्रीमंत व सालस.
माझा जेव्हा विवाह झाला तेव्हा २००५ साली योगिता ला भेटायला त्या व त्यांच्या स्कूल मधील आणखी एक शिक्षिका सौ अक्षया मॅडम दोघीजणी जोगेश्वरीला आल्या होत्या…तेव्हा प्रथमच माझी ऋता मॅडम व अक्षया मॅडम यांच्याशी ओळख झाली..योगिता देखील या दोघींसोबत पंत वालावलकर शाळेत शिक्षिका असल्याने आता कामानिमित्त रानडे मॅडम शी बोलण्याचा अनेकदा प्रसंग येतो.बरेच दिवसांपासून मनात होते ऋता यांच्याबद्दल थोडंसं लिहावं…तो योग आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त जुळून आला हे विशेष…गेल्या वर्षीच त्यांनी सुवर्ण महोत्सव वाढदिवस साजरा केला. (Golden Jubilee)
आज ऋता मॅडम यांच्या birthday निमित्त त्यांना सुयश चींततो व त्यांचा शतक महोत्सवी वाढदिवसाला आम्ही नक्कीच शुभेच्छा द्यायला येऊ अशी देवाजवळ प्रार्थना करतो…👏
Stay blessed always with Good Health, Peace and Happiness.
