*अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाकडून शासकीय-निमशासकीय उपक्रमांना नेहमीच मोलाचे सहकार्य केले जाते, त्याप्रमाणे दि.२३ रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून संवेदना-२ या निमा संघटना शाखा अक्कलकोट, यांच्या वतीने अन्नछत्र मंडळाच्या परिसरात आयोजित देश व्यापी रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.*
दरम्यान रक्तदान शिबिराचे उदघाटन न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले व सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते व निमाचे पदाधिकारी व सदस्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या रक्तदान शिबिरात स्वामी भक्तांसह सेवेकरी कर्मचारी यांनी सहभाग नोंदवीले. सोलापूर येथील अक्षय ब्लड बँकची टिम उपस्थित होती. याप्रसंगी निमा चे डॉ. प्रदीप घिवारे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. गिरीष साळुंखे, डॉ. आदित्य कोतवाल, डॉ. लिंगराज बोकडे आदिजन उपस्थित होते.
यावेळी न्यासाचे नामा भोसले, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, योगेश कटारे, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!