Akkalkot : अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन सप्ताह साजरा

अक्कलकोट, दि. १४- अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी संचलित सी. बी. खेडगी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिन सप्ताह साजरा करण्यात आला.

राजेराय मठ बेला फाउंडेशन युथ हॉस्टेल असोसिएशन सोलापूर, निसर्ग फाउंडेशन अक्कलकोट, सी.बी. खेडगी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राजेराय मठ परिसरात स्वच्छता करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. आंतरराष्ट्रीय युद्ध हॉस्टेल असोसिएशन शाखा सोलापूर चे सचिव इसाक तांबोळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

राजेराय मठ परिसरात व खेडगी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. राजेराय मठ व बेला फाउंडेशन यांच्या वतीने गावातील प्रमुख ठिकाणी पर्यावरण विषयी जनजागृती पर बॅनर लावण्यात आले व बाजारपेठेत व घरोघरी पर्यावरण संरक्षण विषयी जनजागृती पर माहिती पत्रकाचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे समारोप राजेराय मठात करण्यात आले. सदर समारोप कार्यक्रमास अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे संचालक ॲड. अनिल मंगरुळे यांनी अध्यक्षस्थान भूषविले. मंचावर खेडगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराय आडवीतोट, राजेराय मठाचे उपाध्यक्ष विकास दोडके, सचिव डॉ. किसन झिपरे, राष्ट्रीय छात्र सेनेचे लेफ्टनंट डॉ. बी. एन. कोनदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. एस. स्वामी व प्रा. एस. जे. पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर समारोप कार्यक्रमात प्रसंगी युथ हॉस्टेल असोसिएशनचे सचिव इसाक तांबोळी यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनासंबंधी माहिती दिली. श्रद्धांश झिपरे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.