गावगाथा

*विधान परिषद आमदार श्री योगेशआण्णा टिळेकर यांचा गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी केला सत्कार*

सत्कार सन्मान

*विधान परिषद आमदार श्री योगेशआण्णा टिळेकर यांचा गोगावच्या सरपंच वनिता सुरवसे यांनी केला सत्कार*

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्र विधान परिषदेवर नूतन आमदारपदी निवड झाल्याबद्दल योगेश अण्णा टिळेकर आणि सौ संध्या योगेश टिळेकर यांचा सत्कार गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्रच्या सोलापूर जिल्हा समन्वयक सौ वनिताताई सुरवसे यांनी अक्कलकोट येथील मित्रपरिवारसह त्याच्या घरी जाऊन सन्मान सत्कार करून शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

योगेश अण्णाचं काम आम्ही खूप जवळून पाहिले आहे, चार-पाच टर्म नगरसेवक, पाच वर्ष विधानसभा आमदार, ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्राचे अध्यक्षपद, आणि आता विधान परिषदेवर सहा वर्षे आमदार, असे अनेक पद भूषवून सुद्धा सर्वांना सामावून घेऊन सर्वांचे काम तत्पर करणारे सच्चे आणि हक्काचे असलेले आमच्यासाठी नंबर 1 आमदार आपणच आहात असल्याचे सरपंच वनिता सुरवसे यांनी म्हणाल्या पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या पंचवार्षिक मध्ये थोडक्या मताने विधानसभेला पराभव झाला, पण पराभव झाला तरीसुद्धा आज पर्यंत चार वर्ष स्वखर्चाने इतक्या लोकांचे कामे केले आहेत की, त्यामुळे देवापाशी न्याय आहे याची जाणीव प्रक्षश्रेष्ठींना सुद्धा झाली आणि विधान परिषदेवर घेऊन एक सच्चा कार्यकर्त्याला न्याय मिळवून देण्याचं काम पक्षश्रेष्ठीनी केलं आहे, भारतीय जनता पक्ष आणि पक्षश्रेष्ठींचा जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. अण्णा तुम्ही आम्हा सोलापूर वासियांच्या संकटासाठी नेहमीच तत्पर उभे राहत असता, आम्ही सर्वजण आनंदाने भारावून गेलो आहोत, विधान परिषदेची माळ आपल्या गळ्यात पडल्यामुळे आता आम्हाला अजून एक हक्काचा आमदार मिळाला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

आमदारांचा व त्यांच्या सौभाग्यवतींचा गोगावच्या सरपंच वनिताताई सुरवसे यांनी कौतुक करून फेटा बांधून,केक कापून सत्कार केला.नूतन आमदार श्री योगेश अण्णा टिळेकर यांनी सर्व अक्कलकोटकरांचे आभार मानले आणि माझा निधी सुद्धा तुमच्या गोगावला नक्की देईन असे आश्वासन सरपंच सौ वनिताताई सुरवसे यांना दिले. गोगांव गावामध्ये आपला आमदार निधी वापरण्याचे भाग्य मला मिळेल आपण नक्कीच माझ्या गावाला सुद्धा मदत कराल अशी आशा सौ सुरवसे यांनी व्यक्त केली.
यावेळी, नगरसेविका रंजनाताई टिळेकर,, चेतन दादा टिळेकर, मधुकर सुरवसे,रमेश जगताप, आकाश सुरवसे, राहुल जगताप, अशोक साळुंके,सुनील जगताप, विनायक जगताप, राजाराम जगताप, शामल गायकवाड, सुनीता जगताप, विद्या भवर, निर्मला जगताप, माया सुरवसे, उर्मिला नीळ, विद्या लोंडे,सारिका जगताप,प्रियांका साळुंके,अनिल तावरखेड व इतर मान्यवर उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button