Hinjewadi road close : हिंजवडी ग्रामदैवत श्री म्हतोबा देवाच्या उत्सव कार्यक्रमानिमित्त उद्या अनेक रस्ते असतील बंद ; ट्राफिकमध्ये अडकण्यापुर्वी पाहा पर्यायी रस्ते….

हिंजवडी (प्रतिनिधी) : ग्रामदैवत श्री म्हातोबा देवाच्या उत्सवानिमित्त उद्या, गुरुवारी पारंपरिक बगाड मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने हिंजवडी आणि वाकड परिसरातील वाहतुकीत तात्पुरते मोठे बदल केले आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजल्यापासून मिरवणूक संपेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत.
👇हे मार्ग राहतील बंद…
टाटा टी चौक ते वाकड नाका, जॉमेट्रिक सर्कल ते वाकड नाका, शिवाजी चौक ते भुमकर चौक, इंडियन ऑइल चौक ते विनोदे वस्ती आणि वाकड नाका, मुळा नदी पूल पंक्चर ते वाकड नाका (भुजबळ चौक), जॅग्वार शोरूम ते सयाजी अंडरपास दरम्यानचा सेवा रस्ता हे मार्ग मिरवणुकीच्या वेळेत बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा.
👇वाहतूक पोलिसांचे पर्यायी मार्ग:
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.



