गावगाथाठळक बातम्या

Umarga : शिक्षण सप्ताह निमित्त विविध गुणदर्शन व कौशल्य प्रदर्शन

HTML img Tag Simply Easy Learning    

मुरुम (प्रतिनिधी) : येथील नूतन प्राथमिक शाळेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षण सप्ताहामध्ये सोमवारी (ता. २९) रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापुराव पाटील, उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना शरण पाटील म्हणाले की, तंत्रज्ञानाच्या युगात वावरत असताना विद्यार्थी शिक्षक आणि पालक या सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांनी विविध कौशल्य आत्मसात करावीत. स्वावलंबी जीवन जगण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनाने विविध कौशल्य अंगीकारून आपले जीवन समृद्ध करावे.

HTML img Tag Simply Easy Learning    

या सप्ताहात विविध शैक्षणिक साहित्याचा वापर करून पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित विविध क्रिया यासाठी मनोरंजनात्मक खेळाचे आयोजन करण्यात आले. बालगीते, बडबड गीते, कविता, प्रार्थना, गाणी यासह देशभक्तीपर गीत गायनाचा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात आला. शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी पारंपारिक मातीतल्या खेळासह देशी आणि विदेशी खेळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना विकसित करण्यासाठी संधी देण्यात आली. पर्यावरण रक्षणाचे महत्त्व सांगून वृक्षारोपण करण्यात आले. प्रत्येक बालकास आरोग्य व आनंददायी शिक्षण घेता यावे.यासाठी निपुण बालक प्रतिज्ञा घेण्यात आली. केवळ सप्ताह साजरा न करता बापूराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने स्नेह भोजन देऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली.

HTML img Tag Simply Easy Learning    

मुख्याध्यापक पिरप्पा अष्टगे यांच्या मार्गदर्शनाखाली बळीराम गंगणे यांनी या उपक्रमात सर्वांना सहभागी करून घेतले. बसवराज पाटील, रमाकांत माळी, राजशेखर कोरे, भागवत तोरकडे, माधव जोशी, कविता कदम, लक्ष्मी पवार, राजेंद्र सोनवणे, युवराज खताळ, राजेंद्र परुते, राज चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button