अक्कलकोट भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा…
श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) मंदिर

अक्कलकोट भक्तीत तल्लीन असताना जेव्हा मंदिरात अचानक स्वामी समर्थ प्रकटतात तेव्हा…

: हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केला गेला आहे. आज गुरुवार…आज श्री स्वामी समर्थ (Shri Swami Samarth) यांची सेवा करण्याचा दिवस…त्यामुळे अक्कलकोटपासून (Akkalkot) मुंबईतील (Mumbai news)अनेक स्वामींच्या मठात भक्त स्वामींच्या भक्तीत तल्लिन झालेले पाहिला मिळतात. महाराष्ट्रात (Maharashtra) श्री स्वामी समर्थ भक्तांची मोठी संख्या आहे. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ यांचं भव्य मंदिर आहे. या मंदिरात भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आले असताना अचानक तिथे स्वामी प्रकट होतात तेव्हा…असा एक व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, असं स्वामी सांगतात. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत चौथा मानला जातो. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांची समाधी भक्ताकडून आजही पूजली जाते. गुरुवारच्या दिवशी अक्कलकोटमध्ये भक्तांची रीघ लागते…
स्वामींच्या भक्तीत तल्लीन असतानाच मंदिरात अचानक शिव हर शंकर नमामी शंकर शिव शंकर शंभो ! याचा जयघोष ऐकू येतो आणि स्वामी साक्षात प्रकट होतात. हे दृश्यं पाहून भक्त अवाक् होतात. काय झालं काय होतंय याचा भक्तांना काही कळतं नाही. स्वामी समर्थ…अनेक भक्त त्यांचा चरणी नतमस्तक होतात.
श्री स्वामी समर्थ नावाची एक मालिका टीव्हीवर खूप प्रसिद्ध आहे. त्यातही स्वामीची भूमिका करणारा कलाकारला प्रेक्षक स्वामी म्हणूनच ओळखतात. असाच एक कलाकार हुबेहुब स्वामी समर्थ यांचा रूप करु मंदिरात येतो. हा क्षण कोणीतरी कॅमेऱ्यात कैद केला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडीओ तुफान फिरतोय आहे. काही भक्तांना हा व्हिडीओ आवडला आहे. तर काही यूजर्सने भक्तांचा भावनांशी खेळ करण्यात येतं आहे असं म्हटलं आहे.
