गावगाथा

खेडगी परिवाराचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी अक्कलकोट भूषण सन्मान सोहळ्यात डॉ.जयसिध्देश्वर महास्वामी यांचे गौरवोद्गार

अक्कलकोट भूषण पुरस्कार सोहळा २०२५

अक्कलकोट,
शिक्षणमहर्षी – दानशूर स्व. चनबसप्पा खेडगी यांच्या पावलावर पाऊल ठेवून दिवंगत चेअरमन स्व. शिवशरण खेडगी यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना शिक्षण देणारी अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी स्थापन करण्याबरोबरच वटवृक्षाप्रमाणे प्रगती करुन समाजातील सर्व घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचे हे कार्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन माजी खासदार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य यांनी केले.

सोमवारी सी. बी. खेडगी इंटरनॅशनल स्कूलच्या सभागृहात अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे दिवंगत चेअरमन शिवशरण खेडगी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आयोजित ‘शिव-शरण अक्कलकोट भूषण’ सन्मान सोहळ्यात डॉ. महास्वामीजी बोलत होते. व्यासपीठावर श्री बसवलिंग महास्वामीजी,
श्री. अभिनव शिवलिंग महास्वामीजी (मादनहिप्परगा),
श्री. शिवबसव राजेंद्र महास्वामीजी (खेडगी),
श्री अभिनव बसवलिंग महास्वामीजी (नागणसूर),
प्रभुशांतलिंगेश्वर महास्वामीजी (हत्तीकणबस), माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी, संस्थेचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी, सचिव सुभाष धरणे,उपाध्यक्ष अशोक हारकूड, संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, पवित्रा खेडगी, सिध्दम्मा कलशेट्टी, ज्योती धरणे, विजयालक्ष्मी येलेमी, चन्नवीर खेडगी, प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शिवशरण खेडगी यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.

जयसिध्देश्वर महास्वामीजी पुढे म्हणाले, शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील समाजकार्यात शिवशरण खेडगी यांचे नाव नेहमी अग्रेसर होते. सीमावर्ती भागात सन १९६९ मध्ये खेडगी आजोबांनी शैक्षणिक संस्था उभा केले. आणि त्यांचे सुपुत्र कै. शिवशरण खेडगी यांनी ३० वर्षांपूर्वीपासून मोठ्या प्रमाणात विकसित केले आणि आता विद्यमान चेअरमन बसलिंगप्पा खेडगी यांनी आणखीन जास्त प्रगतीपथावर घेऊन जात आहे. सध्या खेडगी शिक्षण संकुलचे कॅम्पस हे एका विद्यापीठासारखे दिसत आहे. आजोबा आणि वडिलांनी केलेले कार्य म्हणजे ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ यासारखे झाले आहे आणि आता बसलिंगप्पा खेडगी यांची सुरू असलेले शैक्षणिक क्षेत्रातील कार्य म्हणजे समाज भूषणासारखे असल्याचे सांगितले.

प्रास्ताविक भाषण प्राचार्य डॉ. गुरुलिंगप्पा धबाले यांनी
स्व.शिवशरण खेडगी हे एक व्यक्ती नव्हते तर ते महाशक्ती होते. त्यांचे जीवन खासगी नव्हते ते तर एक सार्वजनिक जीवन जगत होते. 12 व्या शतकात शरणांची कायकवे, दासोह व तत्व हे त्रिसूत्र जीवनात आचरणात आणले. त्यांनी अन्नदान, वस्त्रदान आणि गोडेतेल वाटप असे परोपकारी मार्गे जीवन जगले. झाडे फळे देतात, नदी पाणी देतात, गाय दूध देतात. त्याचप्रमाणे त्यांनी समाजोपयोगी कामे केले आहेत. त्यांचे परिवार हे शरण संस्कृतीचे असून आजोबा यांच्यापासून सुरू झालेले कार्याचे मार्ग आता त्यांच्या नातू ( बसलिंगप्पा)पर्यंत आले असून त्याची वारसा नेटाने घेऊन जात असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे,
तहसीलदार विनायक मगर, पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकने, मल्लिकार्जुन पाटील, नरेंद्र गंभीरे, मल्लिनाथ साखरे, महेश हिंडोळे, प्रथमेश इंगळे, आप्पासाहेब पाटील,सुरेश गद्दी, बाळासाहेब मोरे,
सुनील बंडगर, प्रमोद मोरे,
बसवराज तानवडे, तुकप्पा नागुर, विश्वनाथ भरमशेट्टी, बसवराज माशाळे, मल्लिनाथ स्वामी, महेश शावरी, दयानंद उंबरजे, सुरेश सद्दलगी, अण्णाप्पा याबाजी, गुरुशांत हारकुड, सुधीर माळशेट्टी, गुंडप्पा घिवारे, मल्लेशप्पा गोरे, सुरेश उंबराणीकर,
स्वामीराव पाटील, सुनील सिध्दे, राजशेखर मसुती, सुरेश गड्डी, धानप्पा कामाठी, जितेंद्र यारोळे, मल्लिनाथ पाटील, विलास गव्हाणे, जावेद पटेल, मल्लिनाथ दुलंगे, दयानंद बिडवे, सुरेश जिड्डीमनी, नीलकंठ कापसे वकील बागवान, मैन्नोद्दीन कोरबू, सुनील खवळे, अँड. प्रशांत शहा, बाबूशा करपे, शशिकांत बकरे, सिद्धाराम मठपती, शिवलिंगप्पा चौलगी, विलासराव सुरवसे, चिदानंद कुंभार, विलास राठोड, संदीप महिखांबे आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन प्रा. संध्या इंगळे व प्रा. प्रकाश सुरवसे यांनी केले. तर समन्वयक डॉ. गणपतराव कलशेट्टी यांनी आभार मानले.

चौकट —
*यांचा झाला सन्मान*
या सोहळ्यात संजीवकुमार म्हेत्रे (सीईओ-
एमएसईबी), डॉ. किसन झिपरे (सेवानिवृत्त प्राचार्य), विद्या शाबादे – मेंथे ( शिक्षण सेवा), ज्योती गाजरे (निर्भया पथक), डॉ. आर. व्ही. पाटील (आरोग्य सेवा), प्रकाश कोळी (समाजसेवा), श्रीशैल वंजारी (कृषी सेवा), निनाद शहा (उद्योग व्यवसाय), मेजर शांतलिंग पाटील (संरक्षण सेवा), शिवाजी लोखंडे (व्यवसाय), धनराज भुजबळ ( प्रशिक्षक- पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र), श्रीमती रुबीनाफिरदौस इफ्तेकारअहमद खैरदी (कृतज्ञता सन्मान ), आणि डॉ. आबाराव सुरवसे ( वरिष्ठ महाविद्यालय), प्रा. श्रीकांत जिड्डीमनी (कनिष्ठ महाविद्यालय), सातप्पा प्रचंडे (प्रशासकीय कार्यालय), सिद्धाराम अरबाळे व अशोक इसापुरे ( शिक्षकेतर विभाग),
गुणवंत विद्यार्थी पूजा डबरे, प्रियांका पाटील,
अनिता काराजनगी, पूजा हाळनुरे, गायत्री रामपूरे व
झुवेरिया शेख इत्यादी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button