प्रेरणादायक

कर्तव्यदक्ष! मुलीचा आज विवाह; कन्यादान सोडून पोलीस आयुक्त महामोर्चाच्या ड्युटीवर….

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी

कर्तव्यदक्ष! मुलीचा आज विवाह; कन्यादान सोडून पोलीस आयुक्त महामोर्चाच्या ड्युटीवर……
सण, उत्सव, सभा मोर्चात पोलीस कर्मचारी 24 तास तैनात असतो. त्यांच्या कुटुंबापासून दूर पोलीस आपल्या कर्तव्याला महत्व देतात. असेच एक उदाहरण आजही समोर आले आहे.महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधानांविरोधात महाविकास आघाडीने महामोर्चाची हाक दिली आहे. आज 12 वाजता रिचर्डसन अँड कृडास, नागपाडा, मुंबई येथून या मोर्चाला सुरवात झाली आहे. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात आहेत. यात विवेक फणसाळकरही रस्त्यावर उतरून सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेत आहे. परंतु, दुसरीकडे त्यांच्या सुकन्या मैत्रयी फणसाळकर हिचा आज विवाह पार पडत आहे. असे असताना आज पोलीस आयुक्त सुट्टी न घेता महाविकास आघाडीच्या मोर्चासाठी कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेसाठी नेटकरी त्यांना सलाम करत आहेत.
दरम्यान, विवेक फणसाळकर हे 1989 च्या बॅचचे अधिकारी आहेत. जुलै 2018 मध्ये फणसाळकर यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्तपदाचा कारभार सोपवण्यात आला होता. संजय पांडें यांचा कार्यभार संपल्याने फणसाळकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. करोना काळात जीवाची बाजी लावून जनतेचा जीव वाचण्याऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button