श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन संपन्न .
राष्ट्रीय गणित दिन

श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन संपन्न .
वळसंग ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत राष्ट्रीय गणित दिन उत्साही वातावरणात संपन्न झाला.याप्रसंगी सर्वप्रथम थोर गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन पर्यवेक्षक शिवानंद घोडके यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य विरेश थळंगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावचे सरपंचा सौ.महानंदाताई दुधगी, प्रशालेतील शिक्षक तानाजी जमादार, निलकंठ कवटगी हे उपस्थित होते.संजयकुमार धनशेट्टी यांनी आपल्या प्रास्ताविकात गणित दिनाचे महत्त्व सांगून श्रीनिवास रामानुजन यांच्याविषयी माहिती उपस्थितांना सांगितले.तद्नंतर प्रशालेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी गणितावर आधारित कविता व भाषणे सादर केले.सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गावातील महिला बचत गटातर्फे शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी महिला बचत गटातील फरजाना बागवान, भागीरथी सौदागर,पेडसिंगे,मेलकेरी आदि सदस्या उपस्थित होते. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या गणितीय साहित्यांचा प्रदर्शन भरवण्यात आले .सदर प्रदर्शनाचे उद्घाटन सौ.महानंदाताई दुधगी यांच्याहस्ते करण्यात आले.या प्रदर्शनाचा लाभ प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांनी तसेच गावातील जनसेवा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षकांनी घेऊन प्रदर्शनाविषयी समाधान व्यक्त केले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणित विभागातील सिदधाराम भैरामडगी ,बाळकृष्ण गुंड,सिद्धारूढ हिरेमठ, विजयालक्ष्मी थळंगे, कर्मचारी धोंडप्पा वाघमोडे,कट्टेप्पा कोळी आदींचे सहकार्य लाभले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय प्याटी व आभारप्रदर्शन शैला निंबाळ यांनी केले.
