श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजांचं भक्तीमय वातावरणात पूजन
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळा विशेष

श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजांचं भक्तीमय वातावरणात पूजन

ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्या निमित्त सध्या नंदीध्वज पेलण्याचा कसून सराव सुरु असून, दररोज भक्तगणां कडून या सराव नंदीध्वजांचं पूजन करण्यात येऊन महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान बाळीवेस इथल्या हॉटेल ओरिएन्ट लाइटच्या प्रथम वर्धापन दिनाचं औचित्य साधून महेश थोबडे आणि परिवाराच्या वतीनं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या पाच सराव नंदीध्वजाचं पूजन अत्यंत मंगलमय अशा वातावरणात करण्यात आलं. पूजना नंतर भक्तीभावानं या नंदीध्वजांची आरती करण्यात आली. यावेळी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या जयजयकारानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं. या प्रसंगी भक्तगणानांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. असंख्य भक्तगणांनी याचा लाभ घेतला.

या पुजना प्रसंगी यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांच्यासह सुधीर थोबडे, संकेत थोबडे, निखिल थोबडे, प्रथमेश थोबडे, मल्लिनाथ मसरे, सोमनाथ मेंगाणे, मल्लिनाथ खुणे, संजय दर्गोपाटील, बाळासाहेब मुस्तारे, अमर चव्हाण, चंद्रकात वाले , गौरीशंकर वाले, ‘अजित, धुम्मा, प्रशांत धुम्मा, आदित्य धुम्मा, अभिराज धुम्मा, रेवणसिद्ध माशाळ, गंगाधर कुंडल, सागर स्वामी, वीरेश बुगडे, विजयकुमार भोगडे, राजू संजवाडकर, रुद्रय्या गणेचारी, केदार कुंभार यांच्यासह मानकरी तसचं भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
