
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी..

अक्कलकोट: महर्षि विवेकानंद समाजकल्याण संस्था,संचलित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,अभ्यासकेंद्र अक्कलकोट येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ‘सामान्य जनतेचे नेते” सहकार चळवळीचे प्रणेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी केंद्र प्रमुख श्री.मल्लिनाथ ति.कल्याणशेट्टी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्रसिंह लोखंडे, सौ.सुरेखा कल्याणशेट्टी कनिष्ठ महविद्यालयाचे प्राचार्य श्री.मलकप्पा भरमशेट्टी हे उपस्थित होते. या कार्यक्रमास जेष्ठ शिक्षक खंडेराव घाटगे, निवृत्त पर्यवेक्षक शिवानंद पुजारी, सुरेश रुगे, रविंद्र कालीबत्ते,बसवराज कामाठी आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
