गावगाथा

इंदापूर येथे दुसरे मराठी बालसाहित्य संमेलन ज्येष्ठ बाल साहित्यिक आबा महाजन यांची अध्यक्षपदी निवड 

निवड नियुक्ती

इंदापूर येथे दुसरे मराठी बालसाहित्य संमेलन ज्येष्ठ बाल साहित्यिक आबा महाजन यांची अध्यक्षपदी निवड
इंदापूर : (प्रतिनिधी)
शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व अक्षरभारती, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर (जि. पुणे) येथे दुसरे मराठी बालसाहित्य संमेलन येत्या १० व ११ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ बालसाहित्यिक आबा महाजन यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी अक्षरभारती संस्थेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. तुषार रंजनकर यांची निवड करण्यात आली असून संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या हस्ते होणार आहे.
या दोन दिवसीय संमेलनात बालकांसाठी विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मुलांचे कविसंमेलन, कथाकथन, नाट्यसादरीकरण, संवाद सत्रे आदी उपक्रमांचा समावेश असणार आहे. बालमनावर संस्कार घडविणारे व वाचनसंस्कृतीला चालना देणारे हे संमेलन बालसाहित्य क्षेत्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.
इंदापूरसह परिसरातील साहित्यप्रेमी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button