स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

स्वामी कृपेने डॉक्टर ते ॲक्टर यशस्वी जीवन प्रवास – हास्यसम्राट डॉ.साबळे 

हास्य सम्राट डॉ.निलेश साबळे व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

 

HTML img Tag Simply Easy Learning    

स्वामी कृपेने डॉक्टर ते ॲक्टर यशस्वी जीवन प्रवास – हास्यसम्राट डॉ.साबळे 

HTML img Tag Simply Easy Learning    

दहिवडीच्या महात्मा गांधी माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेत जीवनाची दिशा ठरविताना शिक्षणात उत्तुंग भरारी घेतली.
माझा स्वभाव मुळात खोडकर असल्याने विनोद आणि माझा तसा जवळचा संबंध. त्यामुळे एक विनोदक म्हणून माझ्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन होऊ लागला. अशा वेळेसच उच्च शिक्षण घेत जीवनात आयुर्वेदिक डॉक्टर होण्याची संधी लाभली.
पुढील जीवनात विनोदक म्हणून माझे व्यक्तिमत्व नावारूपाला येत गेले. माझ्या विनोदाभास स्वभावामुळे मला अनेक मराठी चित्रपट व नाटकांमध्ये काम करण्याची संधी लाभली. पुढेतर मला झी मराठीवरील चला हवा येऊ द्या या हास्य सिरीयल मध्ये निवेदकाची व सूत्रसंचालनाची जबाबदारी लाभल्याने माझे व्यक्तिमत्त्व प्रचंड प्रसिध्दीस आलेले आहे. ही सर्व स्वामींचीच कृपा आहे. मी एक निश्चयी स्वामी भक्त असल्याने हे सर्व शक्य झालेले आहे. त्यामुळे स्वामी कृपेचे ऋण फेडण्यासाठी आज येथे सहकुटुंब त्यांच्या दर्शनाकरिता आलेलो आहे. कारण माझे जीवन म्हणजे स्वामी कृपेने डॉक्टर ते
ॲक्टर असा यशस्वी जीवन प्रवास सुरू असल्याचे प्रतिपादन झी मराठीवरील प्रसिद्ध हास्य सिरीयल चला हवा येऊ द्या फेम डॉ. निलेश साबळे यांनी केले. ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी साबळे बोलत होते. पुढे बोलताना साबळे यांनी झी मराठी वरील रिॲलिटी शो महाराष्ट्राचा सुपरस्टार जिंकून आपल्या कारकिर्दीस सुरुवात केली. त्यानंतर आपल्याला होम मिनिस्टर, एक मोहोर अबोल व फू बाई फू या मालिकेंमार्फत प्रसिध्दी लाभत गेली. नायक म्हणून नवरा माझा भवरा या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं. सध्या झी मराठी वरील विनोदी कार्यक्रम चला हवा येऊ द्या याच निवेदन करत आहे. या कामी माझ्या असंख्य चाहत्यांचे व आपल्या सर्वांचे शुभेच्छा तर आहेतच. असेच प्रेम यापुढेही माझ्या पाठीशी राहावे याकरिता स्वामी समर्थांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांना चला हवा येऊ द्या या कार्यक्रमास भेट देण्याचे आमंत्रण दिले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, विपुल जाधव, श्रीशैल गवंडी, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, सचिन जाधव, अविनाश क्षीरसागर, सागर गोंडाळ, लखन गवळी, व साबळे कुटुंबीय इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – हास्य सम्राट डॉ.निलेश साबळे व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button