ग्रामीण घडामोडी

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना नव्या वर्षात २०२३ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामास प्रारंभ होईल,

ऊसाला रुपये २ हजार ४०० चा दर देण्याची घोषणा माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केली आहे,

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना सरत्या वर्षात चालु होणार होता, मात्र अंतर्गत विविध विभागाची कामे वाढली गेली, ती देखील अंतिम टप्प्यात आलेली आहेत. नव्या वर्षात २०२३ जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गळीत हंगामास प्रारंभ होईल, ३ लाखाहून अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य असून ऊस उत्पादक माझ्या शेतकर्‍यांना प्रति टन ऊसाला रुपये २ हजार ४०० चा दर देण्याची घोषणा माजी आमदार व कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील यांनी केली आहे, निश्चितच नजीकच्या कारखान्यापेक्षा जादा दर ठरणार आहे.*

स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा सन २०२२-२३ या गळीत हंगामाचा सोमवारी बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा कारखान्याचे संचालक अप्पासाहेब पाटील व त्यांच्या पत्नी श्री.सिध्देश्वर साखर कारखान्याच्या माजी संचालिका सौ.अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष सिद्रामप्पा पाटील, संचालक संजीवकुमार पाटील, कार्यकारी संचालक अशोकराव मुलगे, दिलीप पाटील, मुख्य अभियंता हणंतराव रेड्डी, महेश पाटील, आदर्श पाटील, मल्लिनाथ भासगी, वसीम मुल्ला आदीजण उपस्थित होते.

दरम्यान होम-हवन, सत्यनारायण पूजन, बॉयलर पूजन हे पुरोहित बसवराज शास्त्री यांच्या मंत्रोपचाराने संपन्न झाले. बॉयलर अग्निप्रतिपदन सोहळा हा पुढील काही दिवसात मुहूर्त नसल्याने छोटेखानी सोहळा संपन्न झाला.

माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक संजीवकुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्याचा निर्धार संचालक मंडळाने केल्याप्रमाणे 98 टक्के काम पूर्ण झाले असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गळीतास प्रारंभ होईल अशी माहिती सिद्रामप्पपा पाटील यांनी दिली.

यांत्रिक काम युध्द पातळीवर सुरु  असून सुमारे ४०० हून अधिक कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. मिल विभाग, बगॅस कॅरिअर, बॉयलिंग हाऊस, ज्यूस हाऊस, बॉयलर हाऊस, बॉयलर साईड न्यू ट्युब वर्क, बॉयलर आतील भागातील पुर्णत्वास येत असलेले ट्यूब वर्क, बॉयलिंग हाऊस पंप आणि व्हॉल्व वर्क, शुगर एरिया, शुगर हाऊस, पॅकेजिंग यासह सिव्हील वर्क पत्रा वर्क ही कामे पुर्णत्वास येत असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गळीतास प्रारंभ होईल अशी माहिती सिद्रामप्पा पाटील यांनी दिली.

पाटील म्हणाले, नूतनीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर असून कारखाना सुरु करण्याकामी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री ना.अतुल सावे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे (शिखर बँक) प्रशासक विद्याधर अनास्कर, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांचे सहकार्य लाभत असून यांच्याकडून देखील कारखान्याच्या सुरु असलेल्या कामकाजाची आस्थेने चौकशी केली जात आहे.

*🔶ऊसाला प्रतिटन २ हजार ४०० रुपये दर.*
अक्कलकोट तालुक्यातील एकमेव असलेल्या सहकारी साखर कारखाना हा गेल्या आठवर्षापासून बंद होता. सन २०२३-२४ चा गळीत हंगामत जानेवरी २०२३ च्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. कामे युध्द पातळीवर सुरु आहेत. चोख काटा, २४०० रुपये भाव देणार असून तालुक्यातील जास्त जास्त शेतकर्‍यांनी आपल्या हक्काच्या स्वामी समर्थ साखर कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे.
   -सिद्रामप्पा पाटील, माजी आमदार
अध्यक्ष, स्वामी समर्थ सह.साखर कारखाना दहिटणे, ता.अक्कलकोट

नूतन कार्यकारी संचालकांचे विविध संस्था, व्यक्तीकडून सत्कार :
स्वामी समर्थ सह.साखर कारखान्याचे कार्यकारी संचालकपदी अशोकराव मुलगे यांची निवड झाल्याबद्दल कार्यक्षेत्रासह विविध संस्था, व्यक्तीकडून स्वागत व सत्कार करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button