गावगाथा

अक्षर फराळाला वाचकांचा विक्रमी प्रतिसाद दिवाळी अंकांची उलाढाल दहा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

मागणी असलेले अंक साहित्यविषयक - लोकसत्ता, मौज, अक्षरधारा, अक्षर, दीपावली, हंस, शब्द साधना, किस्त्रीम, कथाश्री, चंद्रकांत, अनुभव, पद्मागंधा

अक्षर फराळाला वाचकांचा विक्रमी प्रतिसाद
दिवाळी अंकांची उलाढाल दहा कोटींच्या घरात जाण्याची शक्यता

ok

पुणे : दिवाळीच्या अक्षर फराळाला वाचकांचा विक्रमी प्रतिसाद लाभत असून, किमतीमध्ये थोडी वाढ झाली असली, तरी यंदा दिवाळी अंकांची उलाढाल दहा कोटी रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. वाचनसंस्कृती लोप पावत असल्याची तक्रार दूर करत दिवाळी अंक खरेदी करण्यावर भर देण्यात आला असून, या वर्षी आठ ते दहा दिवाळी अंकांचा श्रीगणेशा झाला आहे.

दिवाळी म्हटले, की नवे कपडे, गृहोपयोगी वस्तू, बालगोपाळांसाठी किल्ला आणि किल्ल्यावरील चित्रे या खरेदीबरोबरच अक्षर फराळ असा लौकिक संपादन केलेल्या दिवाळी अंकांची खरेदी आवर्जून केली जाते. दिवाळी अंकांच्या खरेदीसाठी अनेक घरांमध्ये काही निधी बाजूला ठेवला जातो. महागाईच्या काळात नव्या खरेदीला लगाम घालून दिवाळी अंकांची खरेदी करण्यावर अनेकांचा भर असतो. त्यामुळे ‘मनोरंजन’ मासिकाच्या अंकापासून सुरू झालेली दिवाळी अंकांची परंपरा ११४ व्या वर्षी वर्धिष्णू होत आहे.

वैविध्यपूर्ण विषयांची हाताळणी करणारे तीनशेहून अधिक दिवाळी अंक बाजारामध्ये आले असून, त्यांपैकी काही अंक आता उपलब्ध नाहीत. कागदाचे दर वाढल्याने यंदा सर्वच दिवाळी अंकांच्या किमतीमध्ये २० ते २५ टक्के वाढ झाली आहे. मात्र, तरीही दिवाळी अंकांच्या खरेदीची मागणी कायम आहे. त्यामुळे गेल्या वर्षी आठ कोटी रुपयांपर्यंत असलेली दिवाळी अंकांची राज्यभरातील उलाढाल यंदा दहा कोटी रुपयांचा पल्ला पार करण्याची शक्यता आहे, अशी माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठीवडेकर यांनी दिली.

मागणी असलेले अंक
साहित्यविषयक – लोकसत्ता, मौज, अक्षरधारा, अक्षर, दीपावली, हंस, शब्द साधना, किस्त्रीम, कथाश्री, चंद्रकांत, अनुभव, पद्मागंधा

बालकुमार – कुल्फी, किशोर, चिकू पिकू, पासवर्ड, साधना बालकुमार

गूढ-रहस्यकथा – धनंजय, नवल, भयकथा, हेर, एकच थरार

विनोदी – आवाज, जत्रा

विषयांना वाहिलेले अंक
समदा – जोडीदार विशेषांक

थिंक पॉझिटिव्ह – अशी केली मात

आपले छंद – नातं विशेषांक

ऋतुरंग – आपलं माणूस

वाघूर – चहा विशेषांक

बोलके दिवाळी अंक
वाचनापेक्षा श्रवणावर भर देणाऱ्यांसाठी या वर्षी बोलके दिवाळी अंक प्रसारित करण्यात आले आहेत. पद्मागंधा प्रकाशनाने ‘शब्द आभा’ या ऑडिओ अंकाची निर्मिती केली आहे. या अंकातील कथा आणि विविध विषयांवरील लेखांचे ध्वनिमुद्रण करून त्याची लिंक यू-ट्यूब वाहिनीवर ठेवण्यात येत आहे. चपराक प्रकाशनातर्फे ‘साहित्य चपराक’ आणि ‘लाडोबा’ हे अंक विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले आहेत. क्यूआर कोड स्कॅन केल्यावर यूृ ट्यूब वाहिनीवर हे अंक ऐकायला मिळतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button