गावगाथा

ठळक बातम्या

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर संयम बाळगा लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्याचा निर्धार माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केलं

अक्कलकोट दि.8: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा वादावर संयम बाळगा लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन मंत्रालय स्तरावर बैठक लावण्याचा निर्धार माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी केलं
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर अक्कलकोट तालुक्यातील जनतेच्या भावना तीव्र झाल्याने त्याचंमनस्थितीत काही गावच्या सरपंचांनी कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता याच पार्श्वभूमीवर गुरुवारी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तडवळ येथील शासकीय विश्राम ग्रह येथे बैठक आयोजित करण्यात आला होता.
माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी जिल्हा परिषद माजीउपाध्यक्ष शिवानंद पाटील शिवयोगी स्वामी निलप्पा विजापूरे शिवसिद्ध बुळ्ळा सुरेश झळकी विवेकानंद उंबरजे बाबुशा कोरपे सिद्धाप्पा गड्डी श्रीशैल करजगी निजमुद्दिन बिराजदार बाबू सुतार पिरोजी शिंगाडे रविकांत बगले देविदास कोळेकर नागनाथ पाटील आपासाहेब बिराजदार यांच्यासह सरपंच महांतेश हत्तुरे महादेव मुडवे बसवराज बोळेगाव आदींची यावेळी उपस्थिती होती.
दरम्यान तडवळ परिसरातील सुमारे 18 ते 20 गावांनी कर्नाटक मध्ये जाण्याचा निर्धार करून तशा प्रकारचा ठराव केल्याने सर्वत्र हा विषय उफाळून आला आहे.
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी सीमा वादा संदर्भात या बैठकीत सर्वांचं मत जाणून घेतली.. या बैठकीत सर्वांच्या भावना लक्षात घेता लवकरच आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या समवेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेऊन लवकरच या संदर्भात ठोस निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावण्या संदर्भात मंत्रालय स्तरावर बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार माजी आमदार सिद्धाराम आप्पा पाटील यांनी या बैठकी प्रसंगी बोलताना दिला..
दरम्यान याप्रसंगी माझी उपाध्यक्ष शिवानंद पाटील माजी उपसभापती प्रकाश हिप्परगी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना संयम बाळगा लवकरच या संदर्भात बैठक लावून प्रश्न मार्गी लावू असे याप्रसंगी बोलताना म्हणाले..
याप्रसंगी आळगेचे सरपंच महांतेश हत्तुरे यांनी प्रशासनाने कितीही दबाव टाकण्याचा आमच्यावर प्रयत्न केला तरी आम्ही त्याला कदापी घाबरणार नाही परंतु आमच्यावर आज पर्यंत झालेला अन्याय जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत आपली भूमिका कायम असल्याची त्यांनी यावेळी स्पष्ट केला.
दरम्यान या बोलवण्यात आलेल्या बैठकीस तालुक्यातील सीमा वरती भागातील विविध गावचे सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते