मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक
मंगेश चिवटेंच्या समाजसेवी कार्याची नोंद

मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्यतत्परतेचे सर्वपक्षीय आमदारांकडून विधिमंडळात कौतुक

मंगेश चिवटेंच्या समाजसेवी कार्याची नोंद

गेल्या ५ महिन्यात १ हजार पेक्षा अधिक गोरगरीब-गरजू रुग्णांना ११ कोटींची आर्थिक मदत वितरित;हजारो रुग्णांचे वाचले प्राण

नागपूर |

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद करण्यात आलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सुरू केला. गेल्या पाच महिन्यात या कक्षातून तब्बल १ हजार पेक्षा अधिक रुग्णांना ११ कोटींची थेट आर्थिक मदत करण्यात आली. यामुळे हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचले.

रूग्णसेवेच्या या कामगिरीबद्दल सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांचे विधानसभेत जाहीरपणे कौतुक केले.