वायरल बातमी

रितेश-जेनेलियांचे मराठी ‘वेड’! तुळजापुरात दर्शन; लातुरात पहिल्या शोसाठी तुफान गर्दी

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे. 

रितेश-जेनेलियांचे मराठी ‘वेड’! तुळजापुरात दर्शन; लातुरात पहिल्या शोसाठी तुफान गर्दी

अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे. 
लातूर/ उस्मानाबाद/ तुळजापूर – पहिला हिंदी चित्रपट ‘तुझे मेरी कसम’चा प्रीमियर शो लातूरमध्येच करून सुपरहिट चित्रपटांची मालिका चाहत्यांसमोर आणणाऱ्या रितेश-जेनेलिया जोडीने मराठी चित्रपट निर्मिती अन् दिग्दर्शनाचे ‘वेड’ही तुफान गर्दीने पूर्ण केले. शुक्रवारी पहिल्या दिवशीच्या ‘शो’ला दोघांनी हजेरी लावली. तत्पूर्वी तुळजापुरात जाऊन श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनही घेतले. अभिनेता रितेश यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही दमदार पाऊल टाकत मराठीतील ‘वेड’ दिग्दर्शित केला आहे. 
शुक्रवारी सकाळी तुळजापुरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. यावेळी पुजारी भोपे भाऊसाहेब पाटील यांनी दोघांचाही सत्कार केला. त्यावेळी मंदिर परिसरात चाहत्यांनी मोठी गर्दी केली. आवडत्या अभिनेत्यासोबत एक छबी टिपण्यासाठी तरुणांनी गराडा घातला. त्यानंतर रितेश-जेनेलिया तुळजापुरातील सिनेमागृहात गेले. तेथील प्रचंड गर्दीमुळे दोघांनीही बाहेरूनच चाहत्यांना अभिवादन केले आणि लातूरकडे प्रयाण केले.
यावेळी जेनेलिया म्हणाल्या, आम्ही दोघांनी मिळून मराठी चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन करावे, अशी इच्छा होती. ती रितेश यांनी ‘वेड’च्या निमित्ताने पूर्ण केली. नक्कीच हा चित्रपट सर्वांना आवडेल. रितेश म्हणाले, देशमुख कुटुंबीय नवीन कार्याचा प्रारंभ श्री तुळजाभवानी मातेचे पूजन व दर्शन करून करतो. त्यासाठी आलो आहे. सर्वांनी चित्रपट पाहावा, तो नक्कीच आवडेल.
लातुरात चित्रपटगृहांमध्ये सकाळी ७ वाजता पहिला शो होता. दुपारनंतरच्या शोसाठी रितेश आणि जेनेलियाही दाखल झाले. त्यांनी प्रेक्षकांसोबत चित्रपट पाहिला. त्यावेळी चाहत्यांच्या गर्दीने चित्रपटगृह, परिसर आणि रस्ते ओसंडून वाहत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button