नुतन वर्षानिमीत्त वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या भक्तीला उधाण
वटवृक्ष मंदिरात नूतन वर्षातील सुख-समृद्धीकरिता भाविकांचे स्वामी चरणी साकडे
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20221230-WA0026-523x470.jpg)
नुतन वर्षानिमीत्त वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या भक्तीला उधाण
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वटवृक्ष मंदिरात नूतन वर्षातील सुख-समृद्धीकरिता भाविकांचे स्वामी चरणी साकडे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
भजनी मंडळाच्या भजनाने व स्वामींच्या नामस्मरणाने नूतन वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात कोल्हापूर, मुंबई येथील पारंपारिक भजनी मंडळांच्या सदाबहार भावभक्तीच्या भजन गीतांनी वटवृक्ष मंदिर व परिसरात नुतन वर्षाचे उत्साहाने स्वागत करण्यात आले. यानिमीत्ताने नुतन वर्षानिमीत्त वटवृक्ष मंदिरात भाविकांच्या भक्तीला अक्षरश उधाण आले होते.
दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप व नुतन वर्षाच्या स्वागताकरीता, कोल्हापूर, पुणे, मुंबई, नागपुर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, धुळे, अहमदनगर, परभणी, नांदेड इत्यादी राज्यातील विविध जिल्हयांसह देश विदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी वटवृक्ष मंदिरात विसावली होती.
येथील वटवृक्ष मंदिरात ३१ डिसेंबरचे विशेष आकर्षण असलेल्या कोल्हापूर येथील भजनी मंडळांच्या भजन गीतांनी दि.३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता नुतन वर्षाच्या स्वागतीय कार्यक्रमांना वटवृक्ष देवस्थान परिसरात सुरुवात झाले. उत्तरार्धात सायंकाळी ६ वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला. प्रारंभी कोल्हापूर येथील श्री साई समर्थ भजन मंडळ यांच्या सुनिल देशमाने प्रस्तुत नुतन वर्ष हे स्वामींच्या चरणी या भजन गीतांच्या कार्यक्रमात गणेश वंदन गीत सादर करून उपस्थित भाविकांची उत्सुकता वाढविली. यानंतर शिर्डी माझे पंढरी, ओंकार स्वरुपा, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, वासुदेव, वासुदेव म्हणा, शेगावीचा राजा, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, इत्यादी श्री स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज, वासुदेव, संत तुकाराम महाराज, आदिंसह अनेक सत्पुरुष संतांच्या भारुडरूपी भजन गीतांसह अनेक भावभक्ती गीते सादर करून नुतन वर्षानिमीत्त पाश्चात्य संस्कृतीस विसंगती देत भारतीय संस्कृतीचे व आध्यात्माचे आदर्श जगासमोर मांडले. या कार्यक्रमात त्यांना गायनावर सुनिल देशमाने, ललाटी भंडारनृत्य अप्पा भद्रीगे, वासुदेवाच्या रुपात युवराज खोत, घागरनृत्य सोनल पुजारी, तबल्यावर बाळू कांबळे, साईबाबाच्या रुपात मन्सूर पठाण, चौडक वादक तानाजी बडेकर, टाळवर ओंकार सोनुले, गणराज रुपात अजिंक्य जाधव, ढोलकीवर तुषार डकरे, विठ्ठलाच्या रुपात सौरभ सोनुले, ढोलकी वादक अमोल साठे, हार्मोनियमवर अण्णा छपरे, आदिनी व इतर सहकाऱ्यांनी साथ संगत केली.
दि : ३१ डिसेंबरच्या रात्री कोल्हापुरच्या गंगावेश येथील उत्तम निगवेकर यांच्या ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळ, मगरमठी येथील श्री.स्वामी समर्थ भजनी मंडळ, दादर मुंबई येथील स्वामी ओम भजनी मंडळ यांच्याही भक्ती गीतांच्या कार्यक्रमात उपस्थित हजारो भाविक भक्ती रसात रंगून गेले. रात्री १o ते पहाटे ४ या वेळेत या भजनी मंडळांचा कार्यक्रम पार पडला. दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्री ११:३० ते १२ या वेळेत हजारो उपस्थित स्वामी भक्तांनी एकमुखाने श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करुन रात्री १२ वाजता असंख्य फटाक्यांच्या आतषबाजीने मोठया उत्साहात नुतन वर्षाचे स्वागत केले, व एकमेकांना नुतन वर्षाच्या शुभेच्छा देत सर्वानी स्वामींचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी सर्व भजनी मंडळाच्या प्रमुखांचे स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद देवून यथोचित सन्मान करुन नुतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या या नंतर पुढील कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आले.
रात्री १२ वाजता ओम स्वामी चैतन्य भजनी मंडळाच्या उत्तम निगवेकर व सहकाऱ्यांनी अनेक भावभक्ती गीते व सोंगी भारुड सादर केले. या कार्यक्रमात श्री स्वामी समर्थ, हरी ओम स्वामी समर्थ, साई बाबा बोलो, अवलिया अवलिया, शंकर महाराजा, खंडेरायाच्या लग्नाला, अंजनीच्या सुता, शिर्डीवाले साईबाबा इत्यादी अनेक भावभक्तीगीतांच्या तालावर राज्यातील व अक्कलकोट शहरातील अनेक अबालवृध्दांनी दृढ भक्ती संकल्पाचा आनंद लुटून नुतन वर्षाचा महोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला.
या नुतन वर्षाच्या निमित्ताने पहाटे ५ वाजता श्रींच्या काकड आरतीनंतर व दिवसभर अनेक स्वामी भक्तांनी श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेवून नुतन वर्ष सुख समृध्दीचे, आनंदाचे व भरभराटीचे जावो या करीता स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना केले. सर्व कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता व सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणेकरीता मंदिर विश्वस्त समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे पदाधिकारी, कर्मचारी, सेवेकरी व भजनी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
फोटो ओळ : कार्यक्रम सादरीकरणा प्रसंगी भजन मंडळाचे कलाकार व सत्कार समारंभप्रसंगी महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)