वागदरी येथे नाभिक समाजाचा २०२६ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न ; मान्यवरांचा गौरव, गुणवंतांचा सत्कार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाला रंगत…..
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका तसेच श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था (रजि.) अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने २०२६ सालच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा प्रकाशन सोहळा प्रदेश उपाध्यक्ष श्री वैभव शेटे सर व श्री रविकिरण वरनाळे यांच्या शुभहस्ते पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच श्री शिवानंद घोळसगाव यांनी भूषविले.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत सेना महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. यानंतर श्री शिवशरणप्पा सुरवसे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना करून उपस्थितांचे स्वागत केले.
या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा विशेष सत्कार.यामध्ये एस. एस. शेळके प्रशालेचे मुख्याध्यापक श्री अनिल देशमुख सर यांना जिल्हा शिक्षक संघटनेकडून मिळालेल्या आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराबद्दल,
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा, अक्कलकोट येथील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी श्री मारुती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल,
ग्रामपंचायत कर्मचारी श्री शाणप्पा माशाळे यांच्या सेवानिवृत्तीप्रसंगी,
कु. ऐश्वर्या मुनोळी हिला एम.डी. (MD) अभ्यासक्रमात प्रवेश मिळाल्याबद्दल,
चि. शशांक बसवराज वरनाळे यांची भारतीय सैन्यात निवड झाल्याबद्दल,
चि. समर्थ गंगाधर सुरवसे यांची जिल्हा परिषद सोलापूर येथे अभियंता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल
या सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री सुदर्शन विभूते, सविता समाज कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष श्री शरणबसप्पा सूर्यवंशी, माजी सरपंच श्री श्रीकांत भैरामडगी, सेवानिवृत्त शिक्षक विस्तार अधिकारी श्री बापूराव चव्हाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री लक्ष्मण सलगरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष श्री शांतईश्वर कोटे, जिल्हा अध्यक्ष श्री संजय चिकले, जिल्हा युवक अध्यक्ष श्री श्रीकांत राऊत, सोलापूर शहर अध्यक्ष श्री संदीप पवार, माढा तालुका युवक अध्यक्ष श्री अतुल भैय्या राऊत, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष श्री दत्ता वाघमारे, कलबुर्गी येथील कवी श्री अमृतराव सुरवसे, भुरीकवठे येथील माजी उपसरपंच श्री सिद्धाराम खुने सावकार, शिवसेना वागदरी विभाग प्रमुख श्री मुगेद्र मुदीनकेरी, सामाजिक कार्यकर्ते श्री शहाबुद्दीन शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्व प्रमुख पाहुण्यांचाही यावेळी यथोचित सत्कार करण्यात आला.
प्रसंगी श्री वैभव शेटे सर, श्री बापूराव चव्हाण सर, श्री अनिल देशमुख सर, श्री शरणबसप्पा सूर्यवंशी यांनी आपले विचार व्यक्त करून समाज एकतेवर, शिक्षणावर व युवकांच्या प्रगतीवर भर देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमात कलबुर्गी येथील कवी श्री अमृतराव सुरवसे व श्री सुभाष सुरवसे सर यांनी सादर केलेल्या विविध विषयांवरील कवितांनी उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास जिल्हा, तालुका, शहर व गाव पातळीवरील पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा सुरवसे, युवक अध्यक्ष श्री श्रीशैल सुरवसे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री सुभाष सुरवसे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री शिवशरणप्पा सुरवसे यांनी मानले.
हा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा सामाजिक एकोपा, गुणवंतांचा गौरव आणि सांस्कृतिक अभिव्यक्ती यांचा सुंदर संगम ठरला.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!