गावगाथा

गावच्या मातीचा सुगंध कणबसच्या शेतात रंगली हुरडा पार्टी….

हुरडा पार्टी

गावच्या मातीचा सुगंध कणबसच्या शेतात रंगली हुरडा पार्टी….
अक्कलकोट तालुक्यातील कणबस येथे पारंपरिक हुरडा पार्टीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. निमित्त होते पुण्यात वास्तव्यास असलेल्या अक्कलकोट तालुक्यातील रहिवाशांचा गावाकडे जाण्याचा ठरलेला बेत. या भेटीला खास रंग चढला तो शैलेश जकापुरे यांचे मामा, सन्माननीय सिद्रामप्पा दोगळे यांच्या कणबस येथील शेतात हुरडा पार्टी आयोजित करण्याच्या निर्णयामुळे.
या हुरडा पार्टीला विरभद्र हारकुड, कल्याणराव मंठाळे, पंडित जकापुरे, शरणप्पा स्वामी, निळकंठ हिळ्ळी, राम आलुरे आदी मित्रपरिवार उपस्थित होता. विशेष बाब म्हणजे कर्नाटकातील आळंद तालुक्याचे आमदार बी. आर. पाटील यांनीही या हुरडा पार्टीला उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

शेतातील मोकळ्या वातावरणात मित्रांचा मेळा जमला. गप्पागोष्टींना उधाण आले होते. सोबत गरमागरम हुरडा, शेंगांची चटणी, ताजे ऊस, बोर, डहाळे असा अस्सल गावरान मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेण्यात आला. शहरातील धावपळीच्या आयुष्यात क्वचितच अनुभवता येणारे हे क्षण सर्वांनी मनापासून जगले.
शहरात पैसा मिळतो, सुविधा मिळतात; मात्र अशा प्रकारचा निवांत आनंद, माणसांमधील जिव्हाळा आणि गावच्या मातीचा सुगंध अनुभवणं तिथे कठीण असतं. गावाकडच्या अशा साध्या पण समृद्ध क्षणांनी मन तृप्त झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. दैनंदिन तणावातून बाहेर पडून असे क्षण मनसोक्त जगणे किती गरजेचे आहे, याचीच जाणीव ही हुरडा पार्टी देऊन गेली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button