अमोलराजे भोसले हे स्वामी सेवेला वाहून घेतले असून न्यासाच्या माध्यमातून महान कार्य घडत आहे.;’ चला हवा येऊ द्या’ या प्रसिध्द हास्य मालिकेतील अभिनेता योगेश सिरसट
अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले हे स्वामी सेवेला वाहून घेतले असून न्यासाच्या माध्यमातून महान कार्य घडत असल्याचे मनोगत ‘चला हवा येऊ द्या’ या प्रसिध्द हास्य मालिकेतील अभिनेता योगेश सिरसट यांनी व्यक्त केले.
ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी माजी आमदार निलम देसाई यांचा देखील श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रसाद हुल्ले, विजय माने, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
Akkalkot: “न्यासाच्या” विविध विकास कामांमुळे अक्कलकोटच्या वैभवात भर -वृषालीराजे भोसले
Akkalkot: श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री जन्मेजयराजेंना दैनिक नवभारत व नवराष्ट्र यांच्या वतीने पुरस्कार जाहीर ; राज्यपालांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार
Akkalkot: वटवृक्ष मंदिरात वटपौर्णिमा सण उत्साहात साजरा ; हजारो सुवासिनींनी मनोभावे केली स्वामींच्या वटवृक्षाची पुजा