स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

भक्ती संस्कृतीला चालना देणारे स्थान म्हणजे वटवृक्ष मंदिर – शिरसाठ

चला हवा येऊ द्या फेम या मराठी सिरीयल मधील योगेश शिरसाठ यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले

भक्ती संस्कृतीला चालना देणारे स्थान म्हणजे वटवृक्ष मंदिर – शिरसाठ

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१३/१/२३) – भारतीय संस्कृतीत भक्ती-अध्यात्म या रूढी परंपरांना प्राचीन काळापासूनच अत्यंत महत्त्व आहे. अगदी द्वापार युगापासून विविध साधुसंत, अवतारी दैवत या भारत भूमीवर नावारूपास आले. त्यापैकी अगदी अलीकडील काळात पाहायचे झाल्यास श्री स्वामी समर्थांचा अवतार हा दैवी अवतार आपणास अनुभवता आलेले आहे. या पाश्वभुमीवर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानची व स्वामी समर्थांची महती ही अनन्य साधारण आहे.
तुमच्यासारख्या छोट्या मोठ्या पडद्यावरील कलाकारांनाही त्यांचे आशीर्वाद आहेत त्यांच्या प्रचितीमुळे आम्ही नकळत स्वामी भक्तीत गुंतत गेलो. आज अनेक भाविकांना स्वामींची प्रचिती येत आहे, त्यामुळे येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे भक्ती संस्कृतीला चालना देणारे स्थान म्हणून नावारूपाला येत असल्याचे मनोगत
चला हवा येऊ द्या फेम या मराठी सिरीयल मधील योगेश शिरसाठ यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सहकुटुंब येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी योगेश शिरसाठ व कुटुंबीयांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी या प्रसंगी शिरसाठ बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, विपुल जाधव, इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – योगेश शिरसाठ व कुटुंबीयांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button