गावगाथा

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीद वाक्य जगण्यासाठी मोठा आधार – सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर

श्री स्वामी समर्थांच्या दर्शन व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची प्रतिक्रीया.

भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीद वाक्य जगण्यासाठी मोठा आधार – सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर

श्री स्वामी समर्थांच्या दर्शन व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांची प्रतिक्रीया.

(श्रीशैल गवंडी, दि.२७/०३/२६ अ.कोट)
मुंबई शहर व उपनगरांमध्ये स्वामी भक्तांच्या स्वामी भक्तीची उपासना फार मोठी आहे. घडाळाच्या काट्याप्रमाणे कधीही न थांबणारे अनेक मुंबईकर आपल्या व्यस्त जीवन शैलीतही नियमीतपणे स्वामीनाम घेण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. दैनंदीन जीवनात अनेक स्वामी भक्त माझ्या संपर्कात येतात. त्यांची स्वामी भक्ती पाहून मलाही गहिवरून येते. त्यांच्या प्रमाणे अलीकडील काही वर्षात मी ही स्वामीनामाचा जप करू लागले आहे. नियमीतपणे स्वामींचे नाम घेतल्याने प्रचंड मानसिक उर्जा लाभते. या माध्यमातून स्वामी आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे जाणवते, त्यामुळे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे ब्रीद वाक्य जगण्यासाठी मोठा आधार असल्याचे मनोगत प्रसिध्द सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा श्री.स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला, तसेच मंदीर समितीच्या वतीने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या श्री स्वामी पुण्यतिथी महोत्सवाची निमंत्रण पत्रिका देवून निमंत्रीत केले. यावेळी अभिनेत्री वर्षा उसगांवकर बोलत होत्या.
पुढे बोलताना अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी श्री स्वामी समर्थानी आपल्या अगाध लिलांच्या माध्यमातून तहयात भाविक जनतेसाठी अनेक चमत्कार केल्याने स्वामींचा भाविक वर्ग मोठा आहे. “हम गया नही जिंदा है” या ब्रीदवाक्यामुळे श्री स्वामी समर्थांचे
मुळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात स्वामींच्या जागृततेची व त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आजही अनेक भाविकांना येत आहे, त्यामुळे सुज्ञ नागरीक हे स्वामी भक्तीत व स्वामी सेवेत जीवन गुंतवून स्वामी कृपेची सावली आपल्या कुटूंबावर घेत आपल्या कुळांचा उद्धार करून घेत आहेत.
श्री स्वामी समर्थाच्या दर्शनाकरीता येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात येणाऱ्या भाविकांसाठी मंदीर समितीच्या वतीने समितीचे प्रमुख महेश इंगळे हे तेवढ्याच तन्मयतेने व नम्रतेने स्वामी भक्तांची सेवा करीत सुलभ दर्शन व्यवस्थेसह देवस्थान समितीच्या माध्यमातून विविध समाज उपयोगी धार्मिक, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून स्वामी भक्तांच्या दातृत्वाचे पुण्य फळाला आणले आहे, यानिमीत्ताने त्यांच्या सेवेप्रती महेश इंगळे यांच्या चरणी ही माझे साष्टांग नमन असून मंदीर समितीच्या उपक्रमास व इंगळे कुटूंबियाच्या स्वामी सेवेस माझ्या शुभेच्छा असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रथमेश इंगळे, नगरसेवक शिवकुमार स्वामी, मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, प्रा.शिवशरण अचलेर, सागर गोंडाळ, विपूल जाधव, अंकूश केत, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार आदींसह भाविकभक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – देवस्थान अतिथी कक्षात सिने अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांचा सत्कार करताना नगरसेवक व चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button