गावगाथा

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची अन्नछत्र मंडळास भेट; कार्याचे कौतुक

अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची अन्नछत्र मंडळास भेट; कार्याचे कौतुक

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
Shri Swami Samarth Annachhatra Mandal चे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाची नेत्रदीपक प्रगती होत असून भक्तांच्या सोयी-सुविधांना प्राधान्य दिले जात आहे. अन्नछत्र ही एक स्वामी शक्ती असून “अशक्य ते शक्य करतील स्वामी, हम गया नाही जिंदा आहे!” याची साक्ष देणारे हे कार्य असल्याचे मनोगत आघाडीच्या मराठी चित्रपट अभिनेत्री Varsha Usgaonkar यांनी व्यक्त केले.
त्या अन्नछत्र मंडळास भेट देण्यासाठी आल्या असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी योगेश साठे, दत्तप्रसाद गावडे, मनोहर मोहिते, अनिता सय्यद, विक्रांत पिसे आदी उपस्थित होते.
अभिनेत्री Varsha Usgaonkar यांनी अन्नछत्र मंडळात प्रत्यक्ष सेवा बजावत महाप्रसाद तयार करण्याच्या विभागाची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. गेल्या ३८ वर्षांपासून अखंड सुरू असलेले महाप्रसादालय हे सातत्य, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे त्यांनी गौरवोद्गार काढले.
यावेळी न्यासाचे सचिव शामराव मोरे, लेखापरीक्षक (सी.ए.) ओंकारेश्वर उटगे, शिल्पकार प्रशांत खेडकर (पुणे), वास्तुविशारद अभियंता योगेश अहंकारी, अभियंता अमित थोरात, शिवराज स्वामी, सौरभ मोरे, प्रवीण घाटगे, वैभव मोरे, गोटू माने, स्वामिनाथ बाबर, बाळासाहेब पोळ, कुमार सलबत्ते, नामा भोसले, राहुल इंडे, रोहित कदम, चंद्रकांत हिबारे, पिंटू हळ्ळूरे, किरण साठे, एस. के. स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, लक्ष्मण बिराजदार, श्रीनिवास गवंडी, राजू पवार, रमेश हेगडे, तानाजी पाटील, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, अनिल बिराजदार, विशाल घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी व भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
अन्नछत्र मंडळाच्या माध्यमातून भक्तांना दिली जाणारी अखंड सेवा आणि व्यवस्थापनाची शिस्त यामुळे संस्थेचे कार्य अधिक व्यापक होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button