*राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत रघुकुल विद्यालयाचे यश*
पाटण – ध्येय प्रकाशन ॲकडमी महाराष्ट्र यांच्या वतीने जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या विनर ऑफ द इयर या क्रमिक पाठ्यक्रमावर आधारीत असलेल्या स्पर्धा परीक्षेत सुयश मेडिकल अँड चॅरिटेबल सोसायटी संचलित,रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडे नवारस्ता या विद्यालयातील इयत्ता ३री मध्ये शिकत असणारे कु. राजवीर संभाजी भिसे,कु.शौर्या संतोष कदम व कु.आयुष रामदास कांबळे या विद्यार्थ्यांनी राज्य गुणवत्ता यादीत क्रमांक प्राप्त केलेला आहे.
याबद्दल या तिन्ही विद्यार्थ्यांचे रघुकुल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.श्री.विजय देसाई सर,संस्थेचे सचिव मा.सौ. डॉ.रूपाली देसाई मॅडम, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सविता सुर्वे , मार्गदर्शक शिक्षक श्री.महेश पाटील सर, विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,आजी माजी विद्यार्थी पालक यांनी तिचे अभिनंदन केले, व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!