गावगाथा

वागदरीच्या अंगणवाडी सेविका सौ. सुनिता सोनकवडे यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान 

पुरस्कार वितरण सोहळा

वागदरीच्या अंगणवाडी सेविका सौ. सुनिता सोनकवडे यांना ‘राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार’ प्रदान 

सोलापूर : प्रतिनिधी —आविष्कार सोशल अँड एज्युकेशन फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६ मोठ्या उत्साहात आणि दिमाखात सोलापूर येथे पार पडला. या सोहळ्यात अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील अंगणवाडी सेविका सौ. सुनिता पंचप्पा सोनकवडे यांना राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सोलापूर येथील श्री हिराचंद नेमचंद वाचनालय येथे झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त दिपक आर्वे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कवी, लेखक व भाषण प्रशिक्षक सचिन वायकुळे होते. तसेच उद्योगपती प्रमोद तम्मवार यांची विशेष उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार तथा आविष्कार फाउंडेशन इंडियाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले होते. कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा राजमाता जिजाऊ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या सशक्तीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. तसेच महिलांनी विविध क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. बी. शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सौ. रेखा सोनकवडे यांनी केले. या प्रसंगी सोनकवडे व शिंदे परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button