कु. चैतन्य वरनाळे यांचा वागदरीत सत्कार
वागदरी – स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने तसेच अक्कलकोट येथील लीड शाळेत (LEAD School) शिक्षण घेणाऱ्या वागदरीतील विद्यार्थी कु. विक्रांतराजे सोनकवडे, साई कलाल व आर्यन बनसोडे यांच्या पुढाकारातून दहावी CBSE परीक्षेत अक्कलकोट तालुक्यात व लीड शाळेत ९७ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या कु. चैतन्य रवीकिरण वरनाळे यांचा सत्कार करण्यात आला.
वागदरी येथील परमेश्वर मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात कु. चैतन्य वरनाळे यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशामुळे गावासह तालुक्याचे नाव उज्ज्वल झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
या प्रसंगी रमेश सावंत, सुधीर सोनकवडे, मारुती शिंदे, इसराईल नदाफ, बसवराज कलशेट्टी, मंजुनाथ पोमाजी, विजय शिंदे, श्रीकांत इंडे, शिवराज सरसंबी, विकास नंजुडे, गुरु आळंद, महादेव सोनकवडे, परमेश्वर फुलमाळी, महेश बंडगर तसेच कु. चैतन्य वरनाळे यांचे वडील रवीकिरण वरनाळे यांच्यासह वागदरीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी कु. चैतन्य वरनाळे यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!