निसर्ग संवर्धन उपक्रमांना आमचा नेहमीच पाठींबा – चेअरमन महेश इंगळे
यशकल्याणी नेचर काँझर्वेशनच्या वतीने महेश इंगळे व अमोलराजे भोसले यांचा जेऊर येथे सन्मान.
नगरसेवक महेश इंगळे यांची पक्षी संवर्धनासाठी मदतीची ग्वाही
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.२१/०४/२६)
निसर्गसंवर्धन ही अत्यंत महत्त्वाची बाब असून या क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना सहकार्य करून त्यांना प्रोत्साहन देत निसर्ग संवर्धन उपक्रमांना आमचा नेहमीच पाठींबा असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश मालक इंगळे यांनी केले.
नुकतेच देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर येथील पक्षीमित्र कल्याणराव साळुंके यांच्या निवासस्थानी सदीच्छा भेट दिली. यावेळी करमाळा येथील यशकल्याणी नेचर काँझर्वेशन सोसायटीच्या वतीने देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचा साळुंके परिवारातर्फे पक्षी प्रतिमा भेट देऊन तसेच जोधपुरी फेटा बांधून गौरव करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक महेश इंगळे बोलत होते. या प्रसंगी पक्षीसंवर्धनासाठी कार्य करणाऱ्या यशकल्याणी नेचर काँझर्वेशन संस्थेस मदत करण्याची ग्वाहीही नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.गणेश करे-पाटील यांना दिली.
कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून देवस्थान समितीचे विश्वस्त तथा करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती भारतराव शिंदे पाटील, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गणेश करे-पाटील, प्रयोगशील शेतकरी मा.नितीन तकिक पाटील, आजी-माजी सैनिक संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष मेजर अक्रूर शिंदे, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, जीवन शिक्षण फाउंडेशनचे संस्थापक
प्रा. जयेश पवार, प्रसिद्ध सूत्रसंचालक
व निवेदक प्रा. विष्णु शिंदे सर, मीरा एंटरप्राइजेसचे सौरभ देशमुख, को जन. इंजी मा.दिपक देशमुख, उदयोन्मुख पक्षीमित्र विराज साळुंके व अभयसिंह निंबाळकर आदींसह नगरसेवक महेश मालक इंगळे, प्रथमेश मालक इंगळे
व अमोलराजे भोसले मित्र परिवारातील प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार, निखील पाटील, प्रविण घाटगे आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती.
फोटो ओळ – पक्षीमित्र कल्याणराव साळूंखे यांच्या निवासस्थानी नगरसेवक महेश इंगळे व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचा सत्कार करताना कल्याणराव साळूंखे, डॉ.गणेश करे-पाटील, माजी उपसभापती भारतराव शिंदे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!