भाविकांना दर्शनासाठी प्राधान्य पुर्वक नियोजन वटवृक्ष मंदिर समितीचे स्वागतीय कार्य – ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ह.भ.प.औसेकर महाराजांचा प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते सन्मान.
(अक्कलकोट, श्रीशैल गवंडी) (दिनांक – २२/०४/२०२६) – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी भक्तांकरिता प्राधान्य पुर्वक नियोजन हे
वटवृक्ष मंदिर समितीचे स्वागतीय कार्य असल्याचे मनोगत पंढरपूर येथील
श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमेश
इंगळे यांनी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी ह.भ.प.औसेकर महाराज बोलत होते. पुढे बोलताना ह.भ.प.औसेकर महाराज यांनी सकाळच्या सत्रात जास्तीत जास्त भाविकांना दर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांचं श्रद्धा जोपासण्याचं काम या मंदिर समितींकडून होत असल्याचे मनोगत व्यक्त करून समाधान व्यक्त केले. याप्रसंगी ह.भ.प.आबा महाराज कुरनूरकर, प्रशांत गुरव, श्रीकांत मलवे,
मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर सर, अमर पाटील, सागर गोंडाळ, खाजप्पा झंपले, श्रीकांत मलवे, दर्शन घाटगे, धनराज स्वामी, तुषार मोरे आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.
फोटो ओळ – ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!