श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा – डॉ.पुरूषोत्तम राजीमवाले.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट. दि.२३/०४/२६)
श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीवर राजीमवाले कुटूंबाची भक्तीमय निष्ठा असल्याचे मनोगत येथील विश्व अग्निहोत्र फाऊंडेशन शिवपूरीचे संस्थापक डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी व्यक्त केले. ते नुकतेच आज गुरुवार व गुरुपुष्यामृत मुहूर्ताचा योग साधून सहकुटूंब श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे प्रमुख तथा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांनी मंदीर समिती बद्दल असलेल्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, व्यंकटेश पुजारी, श्रीकांत मलवे, प्रा.शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अंकूश केत, सुनिल पवार आदींसह भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ – श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व कुटूंबियांचा सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे दिसत आहेत.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!