गावगाथा

वागदरीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वागदरी येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन

वागदरीत छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

वागदरी येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गावचे सरपंच श्री. शिवानंद घोळसगाव, ग्रामपंचायत सदस्य श्री. श्रीशैल काका ठोंबरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. रतन बंगरगी, सामाजिक कार्यकर्ते श्री. उमेश पोमाजी, पोलीस हवालदार श्री. मल्लिनाथ बंदीछोडे साहेब तसेच श्री. शरण भरमदे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम, धर्मरक्षण आणि स्वाभिमानी विचारांचा गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत त्यांच्या विचारांचे जतन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मारूती शिंदे,श्री. महादेव सोनकवडे, श्री. सुभाष शिंदे, श्री. स्वामीराव यादव, श्री. राज यादव यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला असून गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button