गावगाथा

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले काम केले आहे – डॉ.विनोद मोहितकर

महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी सपत्नीक घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.

कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले काम केले आहे – डॉ.विनोद मोहितकर
महाराष्ट्र राज्यतंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी सपत्नीक घेतले श्री स्वामी समर्थांचे दर्शन.
(श्रीशैल गवंडी, अ.कोट, दि.१८/०७/२६)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून शिक्षणासोबत संस्कारही दिले जात आहेत ही अभिमानाची बाब आहे कारण कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी खूप चांगले काम केले आहे असे मनोगत महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांनी व्यक्त केले.
नुकतेच डॉ.विनोद मोहितकर यांनी सपत्निक अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाला भेट देऊन स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी डॉ.विनोद मोहितकर यांचा सपत्निक श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी डॉ.विनोद मोहितकर बोलत होते. यावेळी त्यांनी देवस्थान संचलित कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाला भेट देऊन तेथील शैक्षणिक सुविधा व उपक्रमांची माहिती जाणून घेतली. भविष्यात स्वामींच्या आशीर्वादाने ही संस्था राज्यात आदर्श ठरेल असे सांगून तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने महाविद्यालयाला पूर्ण सहकार्य राहील असा मानस व्यक्त केला. यावेळी कै.कल्याणराव इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य नागनाथ जेऊरे सर, प्रा.विजयकुमार पवार सर, देवस्थानचे सचिव आत्माराम घाटगे आणि विश्वस्त महेश गोगी उपस्थित होते.
फोटो ओळ – महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर यांचा सपत्निक सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, प्रा.नागनाथ जेऊरे व अन्य दिसत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button