शैक्षणिक घडामोडी

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि गावात भव्य मिरवणूक *तोळणूर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे विजयोत्सव*

तोळणूर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे विजयोत्सव*

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांच्या सत्कार आणि गावात भव्य मिरवणूक
*तोळणूर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांचे विजयोत्सव*
*अक्कलकोट:-*
तालुक्यातील तोळणूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धेत यश मिळविले बद्दल शाळा व शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे भव्य सत्कार करून गावात प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढून अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गावचे सरपंच रमेश हुलमनी होते.व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक तथा वळसंग सूतगिरणीचे संचालक बसवराज उण्णद,शंकरेप्पा रब्बा,केंद्र प्रमुख बसवराज गौडनळ्ळी,जय हिंद शुगरचे श्रीशैल रब्बा,काशिनाथ सलगरे,सुगप्पा केरुर,बसवणप्पा बडदाळे, शरणप्पा फुलारी,उपाध्यक्ष श्रीशैल पाटील,सोमनाथ गंगा,मल्लिनाथ जमादार,मुख्याध्यापक सिदराय बिराजदार,अण्णाराव व्हरकेरी,मंजुनाथ तेली आदी उपस्थित होते.
प्रारंभी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सर्व मान्यवरांच्या स्वागत करण्यात आले. शाळा,केंद्र,बीट,तालुका आणि जिल्हास्तरावर विविध क्रिडाप्रकारात घवघवीत यश मिळवलेल्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनीचे फेटा बांधून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मान्यवरांचे हस्ते देवून सत्कार करण्यात आले.तसेच क्रीडा विभाग प्रमुख बसवराज सक्करगी यांचे यथोचित सत्कार करण्यात आले.यावेळी जय हिंद शुगरचे अग्री ओर्शेयार श्रीशैल रब्बा यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शाळेच्या आणि विद्यार्थी सर्वांगीण विकासाबाबत समाधान व्यक्त केले.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योती शरणप्पा फुलारी यांच्या कडून जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स ड्रेस देण्याचे जाहीर केले.तसेच उपस्थित मान्यवरांनी यशाबद्दल कौतुक करत आर्थिक स्वरूपात रोख रक्कम बक्षिसे देण्यात आले.नंतर गावातील प्रमुख मार्गावरून ट्रॉफी आणि प्रमाणपत्र सोबत भव्य मिरवणूक काढण्यात आले.तब्बल 12 वर्षानंतर शाळेतील विद्यार्थी सहभाग घेवून यश संपादन केल्याने गावातील सर्व नागरिकांनी यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत कौतुक केले.
या वेळी शाळेतील शिक्षक गुंडप्पा पोतदार यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले तर राजशेखर पाटील यांनी आभार मानले .
मिरवणूक यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सिदाराय बिराजदार,राजशेखर पाटील,बसवराज गौडनळ्ळी,अण्णाराव व्हरकेरी,शिवराय रत्नाकर,चन्नप्पा रायकोटी,सिद्रामप्पा भैरामडगी, गुंडपपा पोतदार,सुखदेव कोळी,बसवराज सक्करगी,लक्ष्मीपुत्र कुसगल,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

HTML img Tag Simply Easy Learning    

*फोटो ओळ:-*
तोळणूर (ता.अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेतील विद्यार्थी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत विविध स्पर्धेत यश संपादन केल्याने शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेच्या वतीने भव्य सत्कार करून अभिनंदन करताना प्रसिद्ध उद्योजक तथा वळसंग सूतगिरणीचे संचालक बसवराज उण्णद,शंकरेप्पा रब्बा,केंद्र प्रमुख बसवराज गौडनळ्ळी,जय हिंद शुगरचे श्रीशैल रब्बा,काशिनाथ सलगरे,सुगप्पा केरुर,बसवणप्पा बडदाळे, शरणप्पा फुलारी,श्रीशैल पाटील,सोमनाथ गंगा,मल्लिनाथ जमादार,मुख्याध्यापक सिदराय बिराजदार,अण्णाराव व्हरकेरी,मंजुनाथ तेली आदी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button