भक्ती, सेवा, सहकारात भरीव योगदान देणारे महेश इंगळे लोक गौरव पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी – निलेश अनभवणे
लोक गौरव पुरस्काराने महेश इंगळेंचा सन्मान
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG-20230123-WA0034-772x470.jpg)
लोक गौरव पुरस्काराने महेश इंगळेंचा सन्मान
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
भक्ती, सेवा, सहकारात भरीव योगदान देणारे महेश इंगळे लोक गौरव पुरस्काराचे खऱ्या अर्थाने मानकरी – निलेश अनभवणे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
अनंतकोटी ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांची महिमा अगाध आहे. स्वामी भक्तीचे प्रत्यय भाविकांना येत असल्याने स्वामी भक्तांची संख्या असंख्य आहे. या असंख्य स्वामी भक्तांच्या माध्यमातून येथील वटवृक्ष मंदिरास रोज विविध स्वामी भक्त भेटी देत असतात. सर्वांना उत्कृष्ट स्वामी दर्शनाचे नियोजन भक्ती, सेवाभाव व सहकार हे सुत्र अंगिकारून महेश इंगळे यांनी स्वामी सेवेकरीता भरीव योगदान देत आपले जीवन भक्ती, सेवा व सहकाराकरिता समर्पित केले आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेतल्याने यंदाच्या शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्काराचे महेश इंगळे हे खऱ्या अर्थाने मानकरी असल्याचे प्रतिपादन शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांनी केले. आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष व नगरसेवक महेश इंगळे यांना यंदाच्या वर्षीचे शासन बातम्या राज्यस्तरीय लोक गौरव पुरस्कार मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार समितीचे अध्यक्ष निलेश अनभवणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी अनभवणे बोलत होते. पुढे बोलताना अनभवणे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानने अलीकडील काळात धार्मिक, आध्यात्मिक, व भाविकांना स्वामी दर्शन सेवाकार्यात भरीव योगदान देत मोठ्या स्वामी सेवेचे व्रत जोपासले आहे. या कार्यास मंदिर समितीचे प्रमुख महेश इंगळे यांचे भरीव योगदान लाभले असल्याने हे सर्व शक्य होत आहे. त्यामुळे महेश इंगळेंचे जीवन भक्ती, सेवा व सहकाराने परिपूर्ण असल्याने दि.१८ जानेवारी २०२० साली बिहार येथील विक्रमशीला हिंदी विद्यापीठच्या वतीने सोलापूर विद्यापीठाचे तत्कालीन प्रथम कुलगुरू डॉ.इरेश स्वामी, व विक्रमशीला विद्यापीठाचे तत्कालीन उपकुलगुरु डॉ. संभाजी बावीस्कर यांच्या हस्ते महाराष्ट्र गौरव पुरस्काराने, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीने दि.३ जून २०१८ रोजी राज्य स्तरीय नवरत्न पुरस्काराने, महाराष्ट्र सर फौंडेशनच्या वतीने दि.७ ऑक्टोबर २०१८ रोजी सर पुरस्कार आदी पुरस्कारांसह त्यांचे आजपर्यंत अनेक छोट्या-मोठ्या पुरस्काराने सन्मान झालेले आहेच, परंतु जीवनात त्यांना स्वामी समर्थांनी स्वामी सेवेची मोठी संधी दिलेली आहे. या स्वामी सेवेच्या माध्यमातून साक्षात स्वामी समर्थांनीच त्यांना निरोगी आरोग्यासह, नित्य वक्तशीरपणेचे वरदान देत स्वामी सेवेची संधी देऊन स्वामी सेवेसारख्या मोठ्या पुरस्काराने सन्मानित केल्याने यापेक्षा मोठे भाग्य काय असू शकते असेही प्रतिपादन अनभवणे यांनी शेवटी व्यक्त केले, व महेश इंगळे यांच्या पुढील कार्यास व जीवन वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या प्रसंगी पुरस्कार समितीचे प्रथम अनभवणे, रामनाथ कोळी, अमर कोळी, राहूल तेंडूलकर आदींसह अरुण विभुते काका सुतार, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, संतोष जमगे व स्वामी भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – लोक गौरव पुरस्काराने महेश इंगळेंचा सन्मान करताना निलेश अनभवणे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)