श्रीमंत मालोजीराजे भोसलेंच्या वाढदिवसा निमित्त वटवृक्ष मंदिरात सन्मान
वाढदिवसानिमित्त श्रीमंत मालोजीराजेंनी घेतले स्वामींचे दर्शन.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/01/IMG_20230124_192352-780x470.jpg)
श्रीमंत मालोजीराजे भोसलेंच्या वाढदिवसा निमित्त वटवृक्ष मंदिरात सन्मान
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
वाढदिवसानिमित्त श्रीमंत मालोजीराजेंनी घेतले स्वामींचे दर्शन.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि २४/१/२३) अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजासाहेबांनी आपल्या २९ व्या वाढदिवसानिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले राजासाहेब यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलताना राजासाहेबांनी स्वामी समर्थांच्या देहरुपी वास्तव्यापासून अक्कलकोट संस्थानच्या राजघराण्यासोबत स्वामींचे सहवास आहे. त्यामुळे अक्कलकोट संस्थानची ही परंपरा कायम राखण्याची संधी आम्हाला मिळालेली आहे हे आमचे मोठे भाग्य आहे. आज वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्याने या संधीचे आनंद द्विगुणीत झालेले आहे असे मनोगत राजासाहेबांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, राजासाहेबांचे बंधू शहाजीराजे भोसले, औरंगाबाद येथील त्यांचे मित्र अक्षय चव्हाण, निशांत पाठक, शिवसेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अमर पाटील, जिल्हा उपप्रमुख, संतोष पाटील, तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानुरे, तालुका संघटक राजू बिराजदार, शहराध्यक्ष मल्लिनाथ खुबा, कोळी महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अरुण लोणारी, व्यंकटेश पुजारी, प्रथमेश इंगळे, गंगाधर कुंभार, गणेश दिवाणजी, श्रीशैल गवंडी, शिवशरण अचलेर, श्रीकांत मलवे, संतोष जमगे, सागर गोंडाळ आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – राजा साहेबांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत तर दुसऱ्या छायाचित्रात स्वामी समर्थांचे दर्शन घेतानाचे प्रसंग.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)