रुग्णसेवा ही एका प्रकारची स्वामी सेवाच – डॉ.धनंजय पाटील
डॉ.धनंजय पाटील व अन्य मान्यवरांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे संपतराव शिंदे व अन्य दिसत आहेत.

रुग्णसेवा ही एका प्रकारची स्वामी सेवाच – डॉ.धनंजय पाटील

प्रतिनिधी अक्कलकोट,
श्री स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक दिनदुबळ्यांना, आजारी लोकांना आपल्या आशीर्वादाने बरे केले आहे. स्वामी समर्थ हे तर या ब्रम्हांडाचेच डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने आपण सर्व स्वामीभक्त सुखाने जीवन जगत आहोत. मीही एक निस्सीम स्वामीभक्त आहे. मी जरी पदवीने डॉक्टर असलो तरी स्वामी भक्तीनेच मीही या मानवी जीवनाचा आनंद घेत आहे. तो आनंद मी माझ्या कामातून पूर्ण करण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतो, त्यामुळे माझ्या हातून होणारी रुग्णांची रुग्णसेवा ही एक प्रकारची स्वामी सेवाच असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.धनंजय पाटील यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी डॉ.पाटील व
निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.रोहन वायचाळ आदींचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी डॉ.पाटील बोलत होते. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव उर्फ भारत शिंदे, महेश गोगी, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, परतरेड्डी चेंडके इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – डॉ.धनंजय पाटील व अन्य मान्यवरांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना महेश इंगळे संपतराव शिंदे व अन्य दिसत आहेत.
