वागदरीत स्वा.सावरकर वाचनालयात शिवजयंती साजरी ; छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी : जयश्री बटगेरी
जयंती विशेष

वागदरीत स्वा.सावरकर वाचनालयात शिवजयंती साजरी ; छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय,सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी : जयश्री बटगेरी

वागदरी — येथील स्वातंत्रवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय वागदरी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी जयश्री बटगेरी ( भा ज पा माहिला तालुका उपाध्यक्षा ) मा .सरपंच रविकीरण वरनाळे . मल्लीनाथ बंदिछोडे,सुधिर सोनकवडे ,अप्पासाहेब दणुरे,शिवानंद चळमरद,परमेश्वर नन्ना,मुन्ना कलशैट्टी, श्रीकांत सोनकवडे, निलकंठ नंदे, सुतार, परमेश्वर पंचाक्षरी,चनबसपा चितली व इतर वाचक सभासद उपस्थित होते.

या प्रसंगी जयश्री बटगेरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी स्थापन केलेले स्वराज्य हा भारताच्या इतिहासातील एक दैदीप्यमान अध्याय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय ध्येय धोरणे आजही आपल्या सर्वासाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या जयंती दिनी त्यांच्या प्रति कृतज्ञता अर्पण करणे, हे सर्वांचे कर्तव्य आहे.अशी भावना व्यक्त केली
