संयम जिद्द चिकाटी मुळे यश खचून आणता येतो : अ पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव
सिद्धार्थ सोशल फाउंडेशन वतीने वसंत भांगे स्मृती दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

संयम जिद्द चिकाटी मुळे यश खचून आणता येतो : अ पोलीस अधीक्षक हिमंतराव जाधव

सिद्धार्थ सोशल फाउंडेशन वतीने वसंत भांगे स्मृती दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप

वागदरी ( प्रतिनीधी ) माणसाने जीवनात संयम जिद्द चिकाटीने प्रयत्न केल्यास जीवनात यशस्वी होऊ शकता असे प्रतिपादन सोलापूरचे अप्पर पोलिस अधीक्षक हिमंतराव जाधव यांनी केले

अक्कलकोट तालुक्यातील मौजे वागदरी येथील एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय येथे वसंत भांगे यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त सिद्धार्थ सोशल फाउंडेशन आयोजित करियर मार्गदर्शन व शालेय साहित्य वाटप कार्यक्रमात बोलत होते कार्यक्रम अध्यक्षस्थानी सरपंच संघटना तालुकाध्यक्ष प्रदीप जगताप हे होते यावेळी व्यासपीठावर पत्रकार चंद्रशेखर भांगे, चेअरमन बसवराज शेळके, गोगांवचे सरपंच वनिता सुरवसे, सिद्धार्थ सोशल फाउंडेशन अध्यक्ष तथा उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, पत्रकार गौतम बाळशंकर, मुख्याध्यापक अनिल देशमुख उपस्थित होते पुढे म्हणाले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील असणे गरजेचे आहे आपण आई वडिलाचे इच्छा पूर्ण करून त्यांना आनंदी ठेवायचं असेल तर जीवनात कष्ट करणे गरजेचे आहे आपण कुठल्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी नियोजन करून अभ्यास करावे व आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रयत्न करावे आरोग्य चांगले असेल तरच आपण मन लावून अभ्यास करू शकता , मला आशा आहे की यातील काही मुलं मुली नक्कीच चांगले अभ्यास करून केंद्रीय लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मध्ये यश मिळवतील , ग्रामीण भागातील अनेक मुलं आज विविध क्षेत्रात गरुड झेप घेत आहे किरनळी सारख्या एक छोटेसे गावातील चंद्रशेखर भांगे आज पुण्यासारख्या मोठ्या शहरात एक निर्भिड पत्रकार म्हणून काम करत आहे ते देखील या शाळेचे विद्यार्थी असल्याचे अभिमान वाटतो आज त्यांनी वडिलांच्या स्मृती दिनानिमित्त एक चांगले उपक्रम घेवून समाजापुढे एक आदर्श निर्माण केले आहे.

कार्यक्रमाचे सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आले त्या नंतर शाळेतील गोर गरीब वंचित घटकातील मुलांना शाळेत साहित्य व कपडे वाटप करण्यात आले त्यानंतर प्रस्तावना सिद्धार्थ सोशल फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे यांनी केले व पत्रकार चंद्रशेखर भांगे, आणि पत्रकार गौतम बाळशंकर यांनी आपले विचार मांडले यावेळी सांस्कृतीक विभाग प्रमुख मलय्या मठपती सर, राजेश्री शेळके मॅडम, कविराज घुंगरे सर, शिवशरण गंवडी सर, विद्याधर पुजारी सर, मलिकार्जून देशमुख सर, दत्तात्रय होटकर सर,
सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंच अध्यक्ष शाम बाबर, प्रदीप भास्कर जगताप, संतोष पोमाजी, प्रकाश पोमाजी, सरपंच सतीश कणमुसे ,अस्लम मुल्ला, मकबूल कणमुसे, विजयकुमार गायकवाड,राहुल राठोड, सोहेल किस्तके , संतोष भालके, सनी बाबर, सचिन कोरे, पिंटू चव्हाण, चनु सरसंबी, सुभाष भोसले, गुरू कुंभार, उमेश मंद्री, महेश ईचगे, एस एस शेळके प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासठी परिश्रम घेतले कार्यक्रम सूत्रसंचालन नितीन कुलकर्णी यांनी केले आभार महादेव सोनकवडे यांनी मानले
