महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल रात्री १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती
स्वामी समर्थ मंदिर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/02/IMG-20230216-WA0023-625x470.jpg)
महाशिवरात्रीनिमित्त वटवृक्ष मंदिरातील दिनक्रमात बदल
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
रात्री १० ते १२ या वेळेत महापूजा व आरती
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट) – सालाबादाप्रमाणे यंदाही येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी माघ वद्य त्रयोदशी रोजी महाशिवरात्री संपन्न होत आहे. ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ही भगवान महादेवाचे भक्त असल्याने येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात महाशिवरात्री अत्यंत भक्तीभावाने संपन्न होत असतो.
महाशिवरात्रीनिमित्त मंदिरातील दिनचर्येत व स्वामींच्या नित्योपचारात पारंपारीक पध्दतीचे बदल करण्यात आले आहेत. सालाबाद प्रमाणे सकाळी साडेअकरा वाजता नित्यनेमाने होणारी नैवेद्य आरती व रात्रीची शेजारती महाशिवरात्रीमुळे होणार नाही. रात्री दहा ते बारा या वेळेत पुरोहीत मोहन पुजारी व मंदार पुजारी यांच्या विधीवत मंत्रोच्चारात मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते रुद्राभिषेक व महाशिवरात्रीची महापूजा होऊन रात्री बारा वाजता श्रींची आरती होईल याची सर्व स्वामी भक्तांनी नोंद घ्यावी अशी माहीतीही महेश इंगळे यांनी याप्रसंगी दिली.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)